Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांचे शासकीय वाहन अडवून, शासकीय कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 01:00 PM
मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांचे शासकीय वाहन अडवून, शासकीय कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे (रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ८ जून रोजी झालेल्या या प्रकरणात १० जुलैला म्हणजे महिनाभरानंतर कारवाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान ८ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मंगेश साबळे हे जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. त्यांचे काही थकीत बिल मिळालेले नव्हते, याच कारणावरून त्यांनी मुख्य कार्यकारी यांच्या दालनासमोर प्रचंड आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्या एका बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यास निघाल्या होत्या. त्या शासकीय वाहनमध्ये बसत असताना आरोपी मंगेश यांनी त्यांचे वाहन अडवले. शासकीय कर्तव्य पार पाडीत असताना त्यांनी वाहनाचा रस्ता रोखून त्यांना इच्छापूर्वक अटकाव केला. या प्रकारानंतर क्रांतीचौक पोलिसांत रितसर तक्रार देण्यात आली. याचा पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

मंगेश साबळे कोण आहेत?

मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीसमोर पैसे उधळण्याचं अनोखं आंदोलन केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. एवढेच नव्हे तर अंतरवली सराटीत जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, तेव्हा त्या घटनेचा निषेध म्हणून मंगेश यांनी भररस्त्यात आपली महागडी कार पेटवली होती. त्यामुळे मंगेश चर्चेत आले होते. तसेच त्यांनी थेट सदावर्ते यांच्या कारचीच तोडफोड करून राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळत मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं होतं. विहिरीसाठी बीडीओ पैसे मागत असल्यामुळे त्यांनी नोटा उधळत आंदोलन केलं होतं. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत मंगेश यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची माध्यमांनीही दखल घेतल्याने अखेर लाचखोर बीडीओला निलंबित करण्यात आलं होतं. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर आरडाओरडा केल्यामुळे मंगेश साबळे चर्चेत आले आहेत.

हे सुद्धा वाचा : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Web Title: Another case has been registered against mangesh sable at the kranti chowk police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

MSRTC News : हरित महाराष्ट्रासाठी एसटीचा पुढाकार; १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण
1

MSRTC News : हरित महाराष्ट्रासाठी एसटीचा पुढाकार; १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; ई-केवायसीनंतर 92 लाख लाभार्थी वगळले, 38% घट
2

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; ई-केवायसीनंतर 92 लाख लाभार्थी वगळले, 38% घट

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
3

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी
4

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.