Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Ratnagiri: आरोपी प्रसाद कदम हा हातात लादी घेऊन उभा होता. 'तुझा काय संबंध' असे म्हणत प्रसाद कदम, पंकज कदम या दोघांनी अस्मिता यांच्या छातीवर हाताने व फायटरने मारहाण केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2026 | 03:43 PM
Ratnagiri Crime

Ratnagiri Crime

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल
  • मांजराच्या वादातून २ गटांत हाणामारी
  • मारहाणीत डोक्याला, कपाळाला, नाकाला दुखापत
रत्नागिरी/Ratnagiri: आरे येथील कदमवाडी परिसरात मांजर हरवल्याच्या क्षुल्लक कारणावरून २ गटांत जोरदार वाद होऊन तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या असून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

पहिली घटना ५ सप्टेंबर रोजी आरे पाखाडी, कालभैरव मंदिरासमोर घडली. फिर्यादी प्रसाद प्रकाश कदम (वय ३७, रा. कदमवाडी) हे आपल्या पत्नीसोबत हरवलेल्या मांजराबद्दल चर्चा करत असताना, संशयितांनी गैरसमजातून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्या, ब्लेड, बुक्क्यांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला चढवला.

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद

मारहाणीत डोक्याला, कपाळाला, नाकाला दुखापत

पहिल्या तक्रारीनुसार, प्रसाद कदम, त्यांची पत्नी पूर्वी कदम, भाऊ पंकज कदम व प्रतीक्षा कदम हे ४ जण या घटनेत गंभीर जखमी झाले. संशयित आरोपीनी पाखाडी साफसफाईच्या कामावरून वाद घालत प्रसाद यांच्या अंगावर धावून जाऊन ब्लेडने ओरखडे मारले. तसेच लाकडी काठी, मुक्क्या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला गंभीर दुखापत झाली
आहे.

या प्रकरणी दिपाली कदम, विदेश कदम, मयुरेश आरेकर, संदेश कदम, आदेश कदम, साक्षी कदम, पल्लवी कदम, अस्मिता पेडणेकर, अपेक्षा कदम, साहिल शिवलकर, सागर शिवलकर, आनंद पेडणेकर, रत्नाकांत मयेकर अशा १४ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गु.र.नं. २०३/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलेवरही उगारला हात; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
दुसऱ्या बाजूने अस्मिता आनंद पेडणेकर (वय ५०, रा. मयेकर वाडी, आरे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या दुकानात जात असताना आरडाओरडा ऐकून भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी प्रसाद कदम हा हातात लादी घेऊन उभा होता. ‘तुझा काय संबंध’ असे म्हणत प्रसाद कदम, पंकज कदम या दोघांनी अस्मिता यांच्या छातीवर हाताने व फायटरने मारहाण केली. तसेच संशयित दुर्वांक कदम याने त्यांच्या डोक्यावर कसल्यातरी वस्तूने मारले, रशंदा कदम हिने काठीने मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रसाद कदम, पंकज कदम, दुर्वांक कदम व रक्षेदा कदम या चौघांविरोधात गु.र.नं. २०४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Clash in aarey over a lost cat violent brawl between two groups ratnagiri crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Beaten Case
  • crime news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
1

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
2

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना
3

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.