Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

Digital Arrest: आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने शिक्षिकेने फोन कट केला. तातडीने सायबर हेल्पलाईनवर तक्रार करून बँक खाते गोठवले आणि विजयदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 04:05 PM
Devgad Crime News

Devgad Crime News

Follow Us
Follow Us:
  • देवगडमध्ये शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
  • डिजिटल अरेस्टची भीती
  • पोलिस गणवेशात केला व्हिडीओ कॉल
देवगड/Digital Arrest: ‘डिजिटल अटकची भीती दाखवून गिर्ये परिसरातील एका शिक्षिकेची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. पोलीस, सायबर गुन्हे शाखा असल्याचे भासवून संशयिताने (Devgad) शिक्षिकेला अटक वॉरंट व कारावासाची भीती दाखवली. या प्रकरणी विजयदुर्ग पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता संशयिताने शिक्षिकेला फोन करून, मोबाईलवर केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अश्लील संकेतस्थळांना भेट दिल्याचा आरोप केला. तसेच मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगितले. एक लाख रुपये दंड आणि वर्षभर कारावासाची भीतीही दाखवण्यात आलो. त्यानंतर व्हाहॉट्सअॅपवर अश्लील छायाचित्रे पाठवून बदनामीची धमकी देण्यात आली.

डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; निवृत्त शिक्षकाला तब्बल 11 लाखांचा गंडा, एक फोन केला अन्…

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने शिक्षिकेने फोन कट केला. तातडीने सायबर हेल्पलाईनवर तक्रार करून बँक खाते गोठवले आणि विजयदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक दत्ता भोसले व पोलिस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.

पोलिस गणवेशातील व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून शिक्षिकेला घाबरवले, वरिष्ठांशी बोलून माफीनामा तयार करून देतो, असे सांगत एक लाख रुपयांच्या दंडापैकी २५ टक्के रक्कम भरल्यास वॉरंट रद्द करण्याचे आमिष दाखवले. घाबरलेल्या शिक्षिकेने संशयिताने दिलेल्या खात्यावर दोन वेळा १२ हजार ५०० रुपये, असे एकूण २५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर माफीनाम्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे दोन मुद्रांक आवश्यक असल्याचे सांगून आणखी ७० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने २५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस अधिकारी, सीबीआय, सायबर गुन्हे शाखा किंवा बैंक अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.
अटक किंवा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून पैसे मागितल्यास नक्कम पाठवू नये. ओटीपी, यूपीआय पिन, बैंक खात्याची अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये. फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन विजयदुर्ग पोलिसांनी केले आहे.

Web Title: Digital arrest fraud with teacher 25 thousand devgad crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • crime news
  • Devgad
  • Digital Arrest

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
2

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
3

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.