Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयनेचे पाणी मुंबईकडे? वाशिष्टी नदी वाळणार, कोकण पेटणार; दाभोळ खाडीतील ८४ गावांचा रोजगार धोक्यात?

नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास स्थानिक जलस्रोतांवर ताण वाढू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 02:49 PM
कोयनेचे पाणी मुंबईकडे? वाशिष्टी नदी वाळणार, कोकण पेटणार; दाभोळ खाडीतील ८४ गावांचा रोजगार धोक्यात?
Follow Us
Follow Us:
  • कोयनेचे पाणी मुंबईला वळवणार
  • वाशिष्टी नदी परिसंस्थेवर दूरगामी परिणामाची भीती
  • बारमाही प्रवाहात आता होणार घट
गुहागर/दिनेश चव्हाण: कोयना जलविद्युत प्रकल्पातून वाशिष्टी नदीत सोडले जाणारे पाणी मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होताच कोकणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रस्तावामुळे वाशिष्टी नदीचा बारमाही प्रवाह, नदीतील मत्स्यसंपदा, भूजल पातळी, शेती, पिण्याचा पाणीपुरवठा आणि नदीपात्रातील पर्यावरणीय संतुलन यावर काय परिणाम होणार, याबाबत नागरिक, शेतकरी, मत्स्यव्यवसायिक आणि पर्यावरण अभ्यासकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्टी नदीपात्रात सोडले जाणारे पाणी गेल्या अनेक दशकांपासून नदीच्या प्रवाहाला आधार देत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे पाणी मुंबईकडे वळविल्यास नदीतील बारमाही प्रवाहात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीतील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होऊन संपूर्ण नदी परिसंस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. वाशिष्ठी नदीवर हजारो नागरिकांचे जीवन अवलंबून आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी, शेती, मत्स्यव्यवसाय आणि विविध लघु उद्योगांसाठी या नदीचा वापर केला जातो.

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास स्थानिक जलस्रोतांवर ताण वाढू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. वाशिष्टी नदीला बारमाही पाणी राहते. खेडर्डी खडपोली लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला नदीतून २५ एमएलडी पाणी उचलले जाते. चिपळूण नगरपालिका १० एमएलडी पाणी उचलते त्याशिवाय स्थानिक ग्रामपंचायती सुद्धा वाशिष्टी नदीतून कोयनेचे पाणी उचलतात. उन्हाळ्यात वाशिष्ठ नदी कोरडी पडली होती त्यावेळी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते मत्स्यव्यवसाय हा कोकणातील अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. दाभोल खाडीच्या किनारी असलेल्या ८४ गावांमध्ये मत्स्य व्यवसाय चालतो. नदीतील पाण्याचे प्रमाण आणि प्रवाह कमी झाल्यास मासे व इतर जलचरांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती मत्स्यव्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक संघटनाना मांडली आपली भूमिका
भविष्यात नदीतील पाण्याप्र सटल्यास सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊन शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात चेत आहे याशिवाय सीतील फण्याचा प्रथन कमी झाल्यास गजमावण्याचे प्रमाण वाहणे, पाण्याच्य गुणवत्तेत बदल होणे, नदीपात्रातील वनस्पती जल्परिणाम होणे आणि खाडी परिसरातील पर्यावरणीय संतुलन निघण्याची राज्यत अपत्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. या प्रस्तलवानात कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पर्यावरणीय परिणाम अहवाल, सामाजिक परिणाम अभ्यास, पर्यावगीय प्रवाहाचा स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

कोयना धरणातून विसर्ग वाढला; कराडमध्ये नदीची पाणीपातळी 29 फुटांवर, प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

पुढील निर्णयाकडे लक्ष
अभ्यासांचे निष्कर्ष सार्वजनिक करून स्थानिक नागरिक, जलउपलब्धता व ग्रामपंचायती, शेतकरी, मत्स्यव्यवसायिक आणि तज्ज्ञ यांच्याशी व्यापक सल्लामसलत झाल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी भूमिका विविध सामाजिक संघटनांनी मांडली आहे. या प्रस्तावाबाबत शासनाकडून अधिकृत भूमिका आणि सविस्तर तांत्रिक अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे प्रस्तावाचे स्वरूप, त्याचा वास्तविक परिणाम आणि पुढील निर्णय प्रक्रिया याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Divert water currently released from koyna hydroelectric project into vashishti river for mumbais water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Kokan News
  • Koyna Dam
  • Mumbai News
  • water news

संबंधित बातम्या

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
1

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
2

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
3

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
4

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.