Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचवायला गेले अन् थेट…’; राजापूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Ratnagiri News: डिंगणी गावात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांचा फडशा पाडण्याचा त्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 02:08 PM
‘बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचवायला गेले अन् थेट…’; राजापूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

कुत्र्याला वाचविताना एकावर बिबट्याचा हल्ला
रवींद्र सहदेव भांबाडे (वय ४५) जखमी
 कुत्र्याच्या वासाने घराजवळ आला बिबट्‌या 

राजापूर: बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्‌याने हल्ला केल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील मूर येथे बुधवारी (दि. १८) रात्री पडली. या हल्ल्यात रवींद्र सहदेव भांबाडे (वय ४५) जखमी झाले. रवींद्र भांबाडे यांची पत्नी व मुले मुंबईला राहत असून, ते कोळंब तिठा येथे एकटेच राहतात. (Ratnagiri) त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी कुत्रे पाळले आहे, त्यांच्या घराजवळच जंगलमय भाग असल्याने बुधवारी रात्री कुत्र्याच्या वासाने बिबट्‌या घराजवळ आला होता. त्याच्या वासाने कुत्रे भुंकू लागले.

कुत्र्यांच्या आवाजाने भांबाडे यांनी घराचा दरवाजा उघडला आणि बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुत्र्यावर झडप घातली. बिबट्‌या घरात घुसताच भांबाडे न्यांना काही सुचेनासे झाले. त्यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी परातील मिळेल ती वस्तू घेऊन बिबट्‌यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामुळे बिबट्‌याने कुत्र्याला सोडले आणि भांबाडे यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यानंतर भांबाडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आवाजाने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन भांबाडे न्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी जोरदार आरडाओरडा करताच बिबट्याने भांबाडे यांना सोडून बाजूच्या जंगलात धूम ठोकली.

अब मैं कोकण आया हू! ‘या’ तालुक्यात बिबट्याचा हैदोस; आधी वासरू अन् आता थेट…

‘या’ तालुक्यात बिबट्याचा हैदोस

डिंगणी गावात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांचा फडशा पाडण्याचा त्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. गावातील काळ मोहल्ला परिसरात काही दिवसांपूर्वी वासराचा बळी घेतल्यानंतर आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन मोहिते यांच्या किमती गाईचा बिबट्‌याने फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या दोन घटनांमुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

घरालगतच्या गोठ्यात इतर गुरांसोबत वावरत असताना बिबट्‌याने अचानक झडप मारून गाईचा फडशा पाडला. हल्ल्यावेळी इतर जनावरे जीवाच्या आकांताने सैरावैरा पळाली. शिक्षण घेतले, कष्ट केले, संसार उभा करण्यासाठी जनावरे विकत घेतली; पण त्यावरच संकट आले तर जगायचे कसे? असा संतप्त सवाल सुदर्शन मोहिते यांनी उपस्थित केला आहे. एका किमती दुभत्या गाईच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुग्ध व्यवसायावरच घाला बसला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Leopard attack on dogs and person rajapur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Dog
  • Leopard Attack
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

RATNAGIRI : युद्धजन्य परिस्थितीमुळे गणेश मूर्तीची निर्यात ठप्प, मूर्तिकार अडचणीत
1

RATNAGIRI : युद्धजन्य परिस्थितीमुळे गणेश मूर्तीची निर्यात ठप्प, मूर्तिकार अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.