Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 02:12 PM
Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट
Follow Us
Close
Follow Us:

खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक
संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे भस्मसात
तांबे कुटुंबावर कोसळले मोठे आर्थिक संकट

खेड: खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत रशीद तांबे यांचे राहते घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण घराला वेढा घातला. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

तांबे कुटुंबावर कोसळले मोठे आर्थिक संकट

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. रविवारी मध्यरात्रीपर्यंत नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी झटत होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने घरातील बहुतांश सामान वाचवता आले नाही.

दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव, शेख सराईतील इमारत आगीत जळून खाक; भीषण घटनेचा Video Viral

या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे. या घटनेमुळे तांबे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगीमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव

सोशल मिडियावर दिल्लीतील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. घटनेविषयी बोलणं केलं तर, गुरुवारी दिल्लीतील शेख सराय परिसरातील जुन्या प्राधिकरण इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेस्थळी दाखल झाल्या. सध्या युद्धपातळीवर अग्निशमन आणि बचाव कार्य सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आजूबाजूचा परिसर सुरक्षित केला जात आहे. ही आग लवकरात लवकर विझावी आणि आणखी वाढू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.

Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल…

नैऋत्य दिल्लीतील मटियाला परिसरातील मासळी बाजाराजवळील एका झोपडपट्टीत भीषण आग लागली असून, त्यात किमान ८० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दिल्ली अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री ११.५४ वाजता झोपडपट्टी आणि लगतच्या भंगार गोदामांमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

 

Web Title: Massive fire in khed tambe mohalla big loss to many families khed news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Fire Brigade
  • Fire News
  • Khed

संबंधित बातम्या

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
1

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक

Accident: गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात
2

Accident: गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

KHED : खेडच्या न्यू मांडवे आणि पोयनार धरणासाठी ४६४ कोटींचा निधी मंजूर; १६ गावांचा पाणीप्रश्न सुटणार
3

KHED : खेडच्या न्यू मांडवे आणि पोयनार धरणासाठी ४६४ कोटींचा निधी मंजूर; १६ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.