Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारचे Konkan Railway कडे दुर्लक्ष; पायाभूत सुविधा सोडाच, पादचारी पूल देखील…

दुहेरीकरण आणि क्रॉसिंगची कामे सुरू असताना इंदापूर, गोरेगाव रोड व सापे वामणे येथील पूर्वीचे उंच फलाट तोडण्यात आले. परंतु ते पुन्हा बांधण्यात आले नाहीत, असा आरोप समितीने केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 02:26 PM
मोदी सरकारचे Konkan Railway कडे दुर्लक्ष; पायाभूत सुविधा सोडाच, पादचारी पूल देखील…
Follow Us
Close
Follow Us:

कोकण रेल्वेवर सुविधांचा फज्जा
कोकण विकास समितीची केंद्र सरकारकडे नाराजी
समितीकडून मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना पत्र

देवेंद्र जाधव/खेड: कोकणातील रेल्वे स्थानकांवरील किमान पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे केंद्र सरकार निधी देत नसल्यामुळे गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून याबाबत कोंकण विकास समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २००८-०९ मध्ये मूळ करारानुसार कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण न झाल्याने कोकण रेल्वेला केंद्रीय अर्थसंकल्पातून निधी मिळत नसल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे. कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांकडून इतर मार्गांच्या तुलनेत ४० टक्के अधिक भाडे आकारले जात असूनही आधुनिक सुविधा तर सोडाच, पण किमान आवश्यक सुविधा देखील उपलब्ध नसल्याचे समितीने म्हटले आहे. कोलाड-मडुरे मार्गावरील इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामणे, दिवाणखवटी, अंजणी, कामथे, कडवई, भोके, निवसर, वेरवली, सौंदळ, खारेपाटण रोड आदी स्थानकांवर उंच फलाट उपलब्ध नसून जमिनीच्या स्तरावरील फलाट आहेत.

पादचारी पुलांचा गंभीर अभाव

दुहेरीकरण आणि क्रॉसिंगची कामे सुरू असताना इंदापूर, गोरेगाव रोड व सापे वामणे येथील पूर्वीचे उंच फलाट तोडण्यात आले. परंतु ते पुन्हा बांधण्यात आले नाहीत, असा आरोप समितीने केला आहे. इंदापूर, विन्हेरे, कळंबणी बुद्रुक, सावर्डा, अडवली, विलवडे, राजापूर रोड, अचिर्णे, झाराप आदी अनेक स्थानकांवर पादचारी पूलच उपलब्ध नाहीत.

कोकणासाठी विशेष सुविधा आवश्यक
रेल्वे बोर्डाच्या २०१८ च्या मानांकनानुसार सर्वी स्थानकांवर उंच फलाट आणि पादचारी पूल अनिवार्य असतानाही कोकण रेल्वे विभागात मानकांचे उल्लंघन होत असल्याची टीका समितीने केली आहे. जास्त पावसामुळे कोकणात स्वतंत्र पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, त्याचप्रमाणे सर्वी फलाटांवर संपूर्ण छत्री (कव्हर) आणि उंच फलाट कोकणात अनिवार्य करणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा

समितीकडून मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना पत्र
या पार्श्वभूमीवर, कोकण विकास समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींना कोकण रेल्वेसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करण्यासाठी पत्र लिहिण्याची घोषणा केली आहे.Mumbai-Goa Vande Bharat : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढल्या, आठवड्यातून 6 दिवस धावणार

“कोकण रेल्वेवर प्रवासी संख्या वाढत असून दुहेरीकरण, सुविधा, आधुनिकीकरण हे कामे पूर्वीच व्हायला हवी होती. केंद्र शासन विलीनीकरण करत नाही, निधी देत नाही आणि त्याचा फटका स्थानिक प्रवाशांना बसतो असे मत जयवंत शंकरराव दरेकर (संस्थापक अध्यक्ष) आणि अक्षय सरोज मधुकर महापदी (कार्यकारिणी सदस्य), कोंकण विकास समिती यांनी व्यक्त केले.

Web Title: Modi government neglect towards providing infrastructure facilities on konkan railway route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Khed
  • kokan railway
  • Modi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.