
photo- ai
पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि चटपटीत पदार्थ खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र याच काळात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशीची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे उघड्यावर ठेवलेले अन्न, दूषित पाणी किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास फूड पॉइझनिंग, पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मान्सूनमध्ये बाहेरचे अन्न खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
Sudden Weight Gain: अचानक वजन वाढतंय? शरीरातील ‘हे’ गंभीर संकेत ओळखायला करू नका उशीर
पाणीपुरीचे पाणी अनेकदा बराच वेळ आधी तयार करून ठेवले जाते. त्यासाठी वापरलेले पाणी किंवा बर्फ स्वच्छ नसेल तर पोटाच्या संसर्गाचा आणि फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.
भेळ, आलू चाट, दहीभल्ले किंवा इतर चाटमधील चटण्या, दही आणि मसाले उघड्यावर ठेवले जातात. पावसाळ्यात त्यामध्ये जीवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते.
रस्त्याच्या कडेला विकली जाणारी आधीच कापून ठेवलेली फळे धूळ, माश्या आणि दूषित वातावरणाच्या संपर्कात येतात. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
पकोडे, समोसे, कचोरी यांसारखे पदार्थ अनेकदा पुन्हा-पुन्हा वापरलेल्या तेलात तळले जातात. त्यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
बाहेर मिळणाऱ्या मोमोजमधील सारण नेहमी ताजे असेलच असे नाही. जुनी भाजी किंवा चिकन वापरल्यास हानिकारक जीवाणू वाढू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.