
Ratnagiri जिल्हा पोलिसांचे मिशन 'थर्टीफर्स्ट'; प्रमुख मार्गावर असणार चेकपोस्ट
हॉटेल, लॉज मालकांच्या बैठका घेणे सुरू
प्रमुख मार्गांवर आहेत तपासणी नाके
रत्नागिरी जिल्हा पोलिसांचे मिशन ‘थर्टीफर्स्ट’
गुहागर: नववर्षांच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अंमली पदार्थाची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे. राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना देण्यात येत आहेत.
New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती
१५ दिवसांपूर्वीच शंभर टक्के बुकिंग
यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला आधारकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, वाहनांची कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. थर्टीफस्टनिमित्त पर्यटक, व्यावसायिक जय्यत तयारी करत असताना ड्रग्ज तस्करही आपले जाळे विस्तारित्त आहेत. पूर्वी मर्यादित असलेला अंमली पदार्थांचा व्यापार आता ग्रामीण भागात पसरत आहे.
ख्रिसमसला गोव्यासारखा अनुभव देतील भारतातील ही 5 ठिकाणं, कमी पैशात इथे घेता येईल सणाचा आनंद
पर्यटकांव पोलिसांची असणार करडी नजर
थर्टीफर्स्ट आनंद लुटण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शांततेत तो सर्वांना उपभोगता आला पाहिजे, यासाठी सर्वत्र पोलिस मेहनत घेत आहेत. इग्ज सप्लाय रोखण्यारण्टी स्थानिक पातळीवर काम केले जात असून, कोणालाही याची माहिती मिळाल्यास पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. चेकपोस्टवर नाकाबंदी केली जाणार आहे. जिल्हयात येणाऱ्या प्रत्येकाला यातील एकातरी चेकपोस्टवरून आवे लागेल, त्या ठिकाणी एक महिला कर्मचा-यांसह तीन कर्मचारी नेमले जाणार आहेत. गुहागरमार्गे दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांवर आमची करडी नजर असणार आहे.
– सचिन सावंत, पोलीस निरीक्षक (गुहागर)>
कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत असा पर्यटकांना द्विगुणित करणारा पर्यटन हंगाम सुरु झाला पर्यटकांना कोकणच्या सौंदर्याचे आतापासूनच वेध लागलेले दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे सर्व लॉज, निवासी स्थाने, पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने बुकींगने हाऊसफुल्ल झालेली आहेत. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण झालेले असून पर्यटकांकडून यावर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. इच्छीत पर्यटन ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याकडून दरवर्षी १ महिना अगोदरच निवासाचे बुकींग केले जाते.