(फोटो सौजन्य – Pinterest)
१. शिलॉन्ग, मेघालय
पूर्वोत्तर भारतातील हे मोहक शहर डिसेंबरमध्ये अक्षरशः गुलाबी रंगात न्हाऊन निघतं. चर्चमधून येणाऱ्या मधुर कॅरल्स, रस्त्यांवरील लखलखाट आणि लोकांची एकमेकांना शुभेच्छा देण्याची धांदल… सगळं शहर उत्सवी रूप घेतं. येथे स्थानिक हस्तकला, खास स्मृतिचिन्हे आणि रंगीबेरंगी बाजार फिरताना क्रिसमसचा माहोल अधिकच खुलतो. भारताची रॉक कॅपिटल म्हणून ओळख असलेलं हे शहर त्या काळात एक सुंदर क्रिसमस व्हिलेज बनून जातं.
२. पुदुचेरी
ख्रिसमसची कल्पना जर तुमच्या मनात मोमबत्त्यांच्या उजेडात न्हालेल्या रस्त्यांशी, समुद्राच्या लाटांच्या आवाजाशी आणि कॉफी–क्रोइसानच्या सुगंधाशी जोडली असेल, तर पुदुचेरी तुमच्यासाठीच आहे. फ्रेंच क्वार्टरमधील पिवळ्या–पांढऱ्या इमारती, सजवलेले चर्च आणि शांत समुद्रकिनारा यामुळे क्रिसमस येथे अतिशय रोमँटिक आणि युरोपसारखा अनुभव मिळतो.
३. मनाली, हिमाचल प्रदेश
हिवाळ्यात मनाली म्हणजे एक परिपूर्ण ‘स्नो वंडरलँड’. बर्फाच्छादित पर्वत, पाइनच्या झाडांवरील दिव्यांची झगमग, आणि हातात गरम चॉकलेट यामुळे मनालीतील क्रिसमस अगदी चित्रपटातील दृश्यांसारखाच भासतो. सोलंग व्हॅलीतील स्कीइंग, स्नोबोर्डिंग तसेच ओल्ड मनालीतील उबदार कॅफेमध्ये बसून बाहेर पडणाऱ्या धुक्याचा आनंद—हे सर्व मिळून हा उत्सव अविस्मरणीय बनतो.
४. शिमला
शिमलामध्ये ख्रिसमस म्हणजे रिजवरील उजळलेले दिवे, मॉल रोडवरील गर्दी, आणि ठंडगार हवेत मिसळलेली उत्सवी धडपड. ब्रिटिशकालीन वास्तूंच्या नटलेल्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा सण शहराला एक वेगळंच रूप देतो. विंटर कार्निव्हल, बर्फवृष्टी आणि ख्रिसमस डेकोरेशन यांमुळे शिमला हा भारतातील सर्वात आकर्षक क्रिसमस डेस्टिनेशनपैकी एक मानला जातो.
५. केरल
जर तुमच्या कल्पनेत क्रिसमससोबत नारळाच्या झाडांची सळसळ, लालटणांनी उजळलेले चर्च आणि मसाल्यांचा दरवळलेला सुगंध असेल, तर केरलची सफर तुमच्यासाठीच आहे. येथे क्रिसमस अत्यंत आध्यात्मिक धाटणीने साजरा होतो. शहरातील छोट्या गल्ली–रस्त्यांपासून ते मोठ्या कॅथेड्रलपर्यंत सर्वत्र दिव्यांचा प्रकाश आणि शांत वातावरण एक सुंदर अनुभव देतात. या वर्षी गोवापेक्षा काही वेगळं अनुभवायचं असेल, तर या पाच ठिकाणी क्रिसमसची जादू तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल.






