Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Police: रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’ यशस्वी; २० महत्वाचे…

बंदोबस्तावर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे नियंत्रण राहते व बंदोबस्तामध्ये सुसूत्रता तसेच बंदोबस्त अधिक प्रभावी व परिणामकारक होत असल्याचे बगाटे यानी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2026 | 11:37 AM
Ratnagiri Police: रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’ यशस्वी; २० महत्वाचे…
Follow Us
Close
Follow Us:

अॅपच्या माध्यमातून बंदोबस्त नेमून प्रभावी व परिणामकारक वापर
रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’ यशस्वी
जिओ लोकेशन मॉनिटर करणे सहज शक्य

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ला पोलिस दलाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी नेमण्यात येणान्या पोलिस बंदोबस्तास्ती नाविन्यपूर्ण अशा ‘बंदोबस्त अॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून अशा अॅपची निर्मिती आणि वापर करण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत २० महत्वाचे व अतिमहत्वाचे बंदोबस्त नेमून प्रभावी व परिणामकारक वापर करण्यात आलेला आहे.

दरम्यान राबवण्यात येणारी विविध अभियाने तसवे इतर महत्वाच्या दिनानिमित्त पोलिस ठाणे व जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त नेमण्यात येतो. ‘बंदोबस्त अॅप’मधील विशेष बाब म्हणजे, सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना डिजिटल पध्दतीने बंदोबस्त पॉईंट व कर्तव्याची नेमणूक याव्दारे करता येते. तसेच अॅपव्दारे आपले देण्यात आलेले कर्तव्य ठिकाण पाहणे व ऑनलाईन हजेरी नोंदवण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. तसेच जर पोलिस अधिकारी-अंमलदार हे त्यांना नेमण्यात आलेल्या बंदोबस्त पॉईंट (बंदोबस्तचे ठिकाण) सोडून इतरत्र ठिकाणी गेल्यास त्याबाबतचा अलर्ट मेसेज वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांना या अॅपच्या माध्यमातून लागलीच प्राप्त होतो. व त्यामुळे बंदोबस्तावर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे नियंत्रण राहते व बंदोबस्तामध्ये सुसूत्रता तसेच बंदोबस्त अधिक प्रभावी व परिणामकारक होत असल्याचे बगाटे यानी सांगितले.

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक

जिओ लोकेशन मॉनिटर करणे सहज शक्य

बंदोबस्त अॅपचा वापर हा नेमण्यात आलेल्या बंदोबस्त दरम्यान देण्यात येणाऱ्या कर्तव्याकरता करण्यात येत असून रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी ‘बंदोबस्त अॅप’ स्वतःच्या मोबाईलवर डाउनलोड करुन घेतलेले आहे. व त्याचा वापर नियमित करण्यात येत आहे. या ‘बंदोबस्त अॅप’व्दारे सर्व पोलिस अमंलदार हे बंदोबस्ताच्या वेळी त्यांना नेमण्यात आलेले कर्तव्य, हे या अॅपमधून स्वतःची हजेरी नोंदवतात व पोलिस अधिकारी- अंमलदार यांनी बंदोवस्त अॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर बंदोबस्ताचे ठिकाणी असणारे पोलिस अधिकारी-अंमलदार यांचे जिओ लोकेशन वरिष्ठ प्रभारी पोलिस अधिकारी, पोलिस अधिक्षक, रत्नागिरी यांना लागलीच मॉनिटर करणे सहज शक्य झाले आहे.

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

जिल्ह्यात १ हजार ४८१ पोलिसांकडून अॅपचा वापर

‘बंदोबस्त अॅप’चे वापरकर्ते स्वतः पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह ४ पोलिस उपविभागीय अधिकारी, १ पोलिस उपअधिक्षक (पोलिस मुख्यालय), रत्नागिरी, १७ पोलिस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ६७ पोलिस उपनिरीक्षक, ११८ सहायक पोलिस फौजदार, ४६४ पोलिस हवालदार आणि ७८८ पोलिस नाईक व पोलिस कॉस्टेबल असे एकूण १ हजार ४८१ जण या ‘बंदोबस्त अॅप’चा वापर करतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ratnagiri police digital security arrangement proves successful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Police News
  • Ratnagiri
  • Ratnagiri police

संबंधित बातम्या

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु
1

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव
2

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा
3

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड
4

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.