
Ratnagiri Police
पर्यटन जिल्हा, असलेल्या रत्नागिरीत ड्रग्जचे नेटवर्क मुळापासून नष्ट करण्यासाठी ही विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या धडक मोहिमेचा भाग म्हणून पोलिसांनी गेल्या वर्षभरात एनडीपीएस कायद्यांतर्गत कठोर पावले उचलत १२ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त
त्याचप्रमाणे अमली पदार्थांची तस्करी आणि प्रत्यक्ष विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या ९ प्रमुख आरोपींना बेड्या ठोकून तुरुंगात धाडले आहे. पोलिसांची ही कारवाई केवळ जुन्या प्रकरणांपुरती मर्यादित नसून, आरोपींच्या आर्थिक आणि सामाजिक नाड्या आवळण्यावर भर दिला जात आहे. या धड़क कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या अवैध धंद्यात असलेल्या इतर गुन्हेगारांमध्येही प्रचंड घबराट पसरली असून, पोलिस प्रशासनाने तस्करांविरोधात संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
तस्करांविरोधातील ही मोहीम इथेच थांचलेली नसून, पोलिसांकडून या कारवाईचा दुसरा टप्पा अधिक वेगाने न राबवला जात आहे. अंमली पदार्थांच्या साखळीत काम करणाऱ्या आणखी १२ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत आणखी अनेक गुन्हेगारांना रत्नागिरी जिल्ह्यातून गाशा गुंडाळावा लागणार आहे. या कारवाईचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी केवळ अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई न करता, संपूर्ण पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यामुळे बाहेरून येणारा पुरवठा रोखण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी कायमचा ‘तडीपारी’सारख्या अत्यंत कायदेशीर व कठोर शखाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. रत्नागिरीला पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त जिल्हा बनवण्यासाठी पोलिस दल कटिबद्ध असून, ही मोहीम भविष्यात अधिक तीव्रतेने चालवली जाणार आहे.