Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतीबाबत मोठा निर्णय; आता सरपंचच असणार…

प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 02:24 PM
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतीबाबत मोठा निर्णय; आता सरपंचच असणार…
Follow Us
Follow Us:

खेडच्या ९८ ग्रामपंचायतीत सरपंचच असणार प्रशासक
ग्रामविकास विभागाने जारी केली अधिसूचना 
प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे राज्य शासनाला अधिकार 

खेड: तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीपैकी मुदत संपलेल्या ९८ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचच प्रशासन सांभाळणार आहेत. हा सरपंचांना खऱ्या अर्थाने बहुमानच मिळाला आहे. याबाबतची ग्रामविकास विभागाने २० फेब्रुवारी २०२६ रोजी अधिसूचना जारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या मुदती न संपल्यामुळे त्याठिकाणी विद्यमान सरपंचच कारभार सांभाळणार आहेत.

प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. या अधिकारांचा आणि त्यासंदर्भात सक्षम करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे व प्रदान केलेले आपले अधिकार त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीवर विदयमान सरपंचाची, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्याकालावधीत प्रशासक माणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विदयमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्गमित आलेल्या अधिसूचनेमुळे लालुक्यातील सरपंच सुखावले आहेत. आतापर्यंत सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी हणून काम करण्याचा अधिकार मिळाला होता. मात्र आता प्रशासनाचे अधिकारी बहणून हेच सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

पुण्यात 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक

ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याऐवजी विद्यमान सरपंचांनाच सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून कामकाजाची जबाबदारी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल ८८७ ग्रामपंचायतींमध्ये मावळत्या सरपंचांना तात्पुरती मुदतवाढ मिळाली आहे.

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदस्य मंडळाची मुदत संपल्यानंतर सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धोरणात बदल करत, पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत निवडणुका घेईपर्यंत विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून आणि उपसरपंच व सदस्य मंडळ प्रशासकीय समिती म्हणून कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Sarpanch administrator in 98 grampanchayat in khed taluka ratnagiri maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Khed
  • Maharashtra Goverment

संबंधित बातम्या

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया
1

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया

16th Finance Commission: १६ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी उत्पन्नवाढ बंधनकारक
2

16th Finance Commission: १६ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी उत्पन्नवाढ बंधनकारक

PM Awas Yojana : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! शासनाकडून कोटींचा निधी, तुमच्या खात्यात आले का पैसे?
3

PM Awas Yojana : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! शासनाकडून कोटींचा निधी, तुमच्या खात्यात आले का पैसे?

‘महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला थेट आदेश
4

‘महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला थेट आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.