Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 11:50 AM
महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी : भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, शेळके अपघात प्रकरण आणि राज्यातील वाढत्या ड्रग्जच्या विळख्यावरून सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

राऊत म्हणाले, २०२३ मध्ये विधेयक मंजूर झाले असताना पुन्हा ते मांडण्याची गरज काय होती? भाजपला या विधेयकाच्या आडून मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा आपला पक्षीय अजेंडा राबवायचा आहे. वास्तविक पाहता, सध्याच्या खासदार संख्येनुसारच ३३ टक्के आरक्षण द्यायला हवे होते, मात्र तसे न करून महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे, ही दुर्दैवी बाब आहे. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या नाराजीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, कदाचित त्यांनी विधान नीट ऐकले नसेल, पण अभ्यास केल्यावर त्यांनाही समजेल की हे विधेयक महिलांच्या हिताचे नव्हतेच.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेचे सदस्य व्हावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी केल्याचे सांगतानाच शिंदे गटाच्या वरळी महोत्सवाचा त्यांनी ‘मोर नाचतो म्हणून तुडतुडा नाचतो’ अशा शब्दात समाचार घेतला. वरळीत आदित्य ठाकरेंच्या अस्तित्वाला कोणताही धोका नसून, शिंदे गट सध्या एकमेकांच्या ‘उरावर’ बसला असल्याची बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

केसरकरांची एसआयटी चौकशी का नाही?

शेळके अपघात प्रकरणावर बोलताना राऊत यांनी हा अपघात नसून ‘घातपात’ असल्याचा पुनरुच्चार केला. अशोक खरात हा तुरुंगातूनही अशा घटना घडवू शकतो, असा दावा करत त्यांनी या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कारनामे उघड होतील, असे संकेत दिले. दीपक केसरकर यांना एसआयटी का बोलावून चौकशी करत नाही? यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

हे सुद्धा वाचा : कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

ड्रग्जवर बंदी घालण्यात सरकार अपयशी

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवताना राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांच्या दाव्याचा दाखला देत ते म्हणाले, फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र ड्रग्जच्या आहारी जात असून, पश्चिम महाराष्ट्र ड्रग्जचे हब बनले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात गोव्यातून येणाऱ्या ड्रग्जवर बंदी घालण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

Web Title: Shiv sena leader vinayak raut has made serious allegations against bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • ratnagiri news
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका खपवून घेणार नाही; शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जरांगे पाटील यांना इशारा
2

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका खपवून घेणार नाही; शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जरांगे पाटील यांना इशारा

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
3

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
4

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.