Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Pratap Sarnaik: ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण 2026’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची ओळख, वास्तव्य, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तीन महिन्यांत परिवहन विभागाकडे सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 05:25 PM
ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Follow Us
Follow Us:
  • Uber-Olaसह ॲप टॅक्सी कंपन्यांना निर्देश
  • चालकांचे डोमिसाइल अन् कागदपत्रे परिवहन विभागाकडे सादर करा
  • ‘ॲग्रीगेटर धोरण 2026’च्या अंमलबजावणीला वेग
मुंबई: ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे सादर करावी. चालकांची ओळख, वास्तव्य तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’ चे सदस्यत्व देण्यात येणार आहे. यासाठी चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र तसेच आवश्यक ती सर्व माहिती तीन महिन्यांच्या कालावधीत सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले.

‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये कार्यरत चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कामगार कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख आणि वास्तव्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करणे, व्यवहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार असून, पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येईल. तसेच त्यांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घ्यावी. अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांच्या अर्जांची आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

संबंधित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना चालकांची आवश्यक माहिती संकलित करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

NCMC Card ST Bus :  NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Web Title: Maharashtra aggregator policy 2026 app based taxi drivers details domicile pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • Rapido

संबंधित बातम्या

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
1

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
3

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
4

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.