
प्रशासकीय दिरंगाईवर सर्जिकल स्ट्राईक
नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि दप्तरी विलंबावरून त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कामात तत्परता दाखवून नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित प्रशासकीय यंत्रणेला दिले. जनतेच्या थेट संपर्कात येणाऱ्या विभागांनी अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवावेत आणि रस्ता नूतनीकरणामुळे अडथळा ठरणाऱ्या विजेच्या खांबांचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे तटकरे म्हणाले. महावितरण आणि स्थानिक पाणीपुरवठा योजनांशी संबंधित तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
एसटी बसस्थानकात स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध असूनही जागेअभावी काम त्यांनी आगार रखडल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. या समस्येवर तात्काळ तोडगा काढून जागेची उपलब्धता करून देण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. मंडणगड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तो लवकर निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे…
पाणीपुरवठा आणि जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेताना त्यांनी, प्रांताधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तक्रारी १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश दिले. जलजीवन मिशनच्या कामांत त्रुटी किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. कृषी विभागाकडून तालुक्यातील शेतीची सद्यस्थिती जाणून घेत शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य पुरवण्याच्या सूचना केल्या. मंडणगडच्या ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करता आंबडवे ते राजेवाडी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोकण सागरी महामार्गावरील बाणकोट-बागमांडला व केळशी येथील पुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले.
Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवावेत आणि रस्ता नूतनीकरणामुळे अडथळा ठरणाऱ्या विजेच्या खांबांचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे तटकरे म्हणाले. महावितरण आणि स्थानिक पाणीपुरवठा योजनांशी संबंधित तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. एसटी बसस्थानकात स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध असूनही जागेअभावी काम रखडल्याबद्दल त्यांनी आगार अधिकाऱ्यांना जाब विचारला, या समस्येवर तात्काळ तोडगा काढून जागेची उपलब्धता करून देण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. मंडणगड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तो लवकर निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.