Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: ‘…अन्यथा नगरपरिषदेवर गुन्हा दाखल करू’; भटक्या श्वानांवरून रत्नागिरीत वातावरण तापले

Ratnagiri: शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण नक्की कधी व किती वर्षांपूर्वी झाले होते, याची आकडेवारी प्रशासनाने जनतेसमोर जाहीर करावी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2026 | 02:55 PM
रत्नागिरी नगर परिषद

रत्नागिरी नगर परिषद

Follow Us
Follow Us:
  • भटक्या कुत्र्यांमुळे रत्नागिरी नगरपरिषदेची अडचण वाढणार
  • रत्नागिरी जिल्ह्यातील भटक्या श्वानांचा धुमाकूळ थांबवा
  • श्वान निर्बीजीकरणाची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी 
रत्नागिरी: शहरात भटक्या श्वानांचा हैदोस अत्यंत भीषण पातळीवर पोहोचला असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरात मारुती मंदिर, एसटी स्टैंड परिसर, माळनाका व शाळा-महाविद्यालयांच्या आसपास श्वानांच्या टोळ्या मोकाट फिरत आहेत. या हिंसक श्वानांकडून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वारांवर सातत्याने जीवघेणे हल्ले केले जात आहेत.

अलिकडेच फगरवठार पोलिस लाइनजवळ खेळणाऱ्या एका निष्पाप छोट्या बालकावर तब्बल ७ ते ८ श्वानांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. या श्वानांनी त्या बालकाला ओढत झाडीत नेले, परंतु सुदैवाने काही जागरूक नागरिकांच्या हे लक्षात आल्याने त्या बालकाचा जीव वाचू शकला. या गंभीर घटनेनंतर शिवसेना (उद्धव – बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी – जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; नगरपरिषदेने केली आता ‘ही’ मोठी कारवाई

या सर्व गंभीर प्रकारावर बोलताना प्रसाद  सावंत यांनी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनावर अत्यंत जोरदार व थेट शब्दांत ताशेरे ओढले आहेत. नगर परिषद केवळ कर वसुली करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण नक्की कधी व किती वर्षांपूर्वी झाले होते, याची आकडेवारी प्रशासनाने जनतेसमोर जाहीर करावी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जर नगर परिषदेने येत्या काही दिवसांत ठोस कारवाई केली नाही व यापुढे कुणाचा जीव गेला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी व प्रशासनाची राहील. अशा स्थितीत थेट पोलिस ठाण्यात जाऊन नगर परिषद प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा कडक इशारा त्यांनी दिला. भटक्या श्वानांच्या समस्येसोबतच शहरात रस्त्यांवर मोकाट फिरणारी गुरेसुद्धा नागरिकांसाठी एक मोठी व त्रासदायक डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Latur crime: लातूरमध्ये मोकाट श्वानांचा धुमाकूळ; दोन चिमुकल्यांनंतर युवकाचाही मृत्यू

या मोकाट जनावरांचा व भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करून रत्नागिरीतील नागरिकांना सुरक्षित वातावरणात मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. रत्नागिरीतील नागरिक नियमितपणे नगर परिषदेला कर भरत आहेत, त्यामुळे त्यांना मूलभूत सुरक्षा व सोयी-सुविधा पुरवणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. जर प्रशासनाने या संदर्भात तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात याविरोधात तीव्र व आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नगर परिषदेने यावर वेळीच गांभीयनि विचार करून शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा.

Web Title: Ubt leader pramod swant street dogs ratnagiri nagarparishad crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • nagar parishad
  • Ratnagiri
  • Stray Dogs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.