Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याना जशास तसे उत्तर! रवीकांत तुपकर यांचा सज्जड इशारा

सेनगाव पंचायत समिती कार्यालयातील आंदोलन प्रकरणात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षावर गटविकास अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला जातो.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 01, 2025 | 06:33 PM
Ravikant Tupkar warns those who file false cases against office bearers Nanded News

Ravikant Tupkar warns those who file false cases against office bearers Nanded News

Follow Us
Close
Follow Us:
  • क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षावर खोटा गुन्हा दाखल
  • खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना इशारा
  • संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक
Nanded News : हिंगोली : सेनगाव पंचायत समिती कार्यालयातील आंदोलन प्रकरणात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षावर गटविकास अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केला असून अशा कारवाया अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असा थेट इशारा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. समाजमाध्यमांवरील वक्तव्यात त्यांनी “खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा उच्चारला आहे.

सेनगाव पंचायत समितीमध्ये संविधान दिन साजरा न केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता. मात्र या प्रकरणात उलट संघटनेच्याच कार्यकर्त्यांवर बदनामी, शासकीय कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यासह तिघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : आमदारांना वाचताही येईना! नितीश कुमारांच्या महिला नेत्याची शपथ घेताना सभागृहात उडाली धांदल

याबाबत रवीकांत तुपकर म्हणाले की, संविधान दिनाच्या कार्यक्रमातील गैरव्यवस्था व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सवाल केले. ही बाब अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी कार्यकर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल केले. “चळवळीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी चौकशी न करता थेट गुन्हा दाखल करणे ही मोठी चूक आहे,” असा आरोप त्यांनी केला.

मागे हटणार नाही
शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला तर जातीच्या आधारावर खोटे गुन्हे दाखल होणार का, असा सवालही तुपकरांनी उपस्थित केला. “जनतेच्या हक्कांसाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तुपकर म्हणाले, “लवकरच हिंगोलीत येतोय. खोटे गुन्हे करणाऱ्यांना जशास तसे उत्तर मिळणारच!”

हे देखील वाचा : ५ वर्षीय बालिकेचे नेत्रदान! आई- वडिलांचा दुःखातही प्रेरणादायी निर्णय

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस, मंगळवार, दि. २ डिसेंबर, २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात अधिसूनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या
क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.

Web Title: Ravikant tupkar warns those who file false cases against office bearers nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • daily news
  • nanded news
  • Ravikant Tupkar

संबंधित बातम्या

Nanded News : ५ वर्षीय बालिकेचे नेत्रदान! आई- वडिलांचा दुःखातही प्रेरणादायी निर्णय
1

Nanded News : ५ वर्षीय बालिकेचे नेत्रदान! आई- वडिलांचा दुःखातही प्रेरणादायी निर्णय

चार भिंतीच्या पलिकडील शाळा…! दप्तराविना विद्यार्थ्यांनी घेतला धडा, नांदेडमध्ये स्त्युत्य उपक्रम
2

चार भिंतीच्या पलिकडील शाळा…! दप्तराविना विद्यार्थ्यांनी घेतला धडा, नांदेडमध्ये स्त्युत्य उपक्रम

Nanded crime: नांदेडमध्ये प्रेमाचा रक्तरंजित शेवट; आंचलच्या वडील आणि भावांकडून सक्षमची निर्घृण हत्या
3

Nanded crime: नांदेडमध्ये प्रेमाचा रक्तरंजित शेवट; आंचलच्या वडील आणि भावांकडून सक्षमची निर्घृण हत्या

पाटणमध्ये घंटागाड्या अडवल्या; शहरातील भटके कुत्रे आणि कचऱ्याचा प्रश्न झालाय गंभीर
4

पाटणमध्ये घंटागाड्या अडवल्या; शहरातील भटके कुत्रे आणि कचऱ्याचा प्रश्न झालाय गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.