Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सगळं काही पणाला लावलं पण…”; Jain Boarding House चा व्यवहार रद्द झाल्यावर धंगेकरांचे सूचक विधान

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनी व्यवहार प्रकरणात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2025 | 02:48 PM
"सगळं काही पणाला लावलं पण..."; Jain Boarding House चा व्यवहार रद्द झाल्यावर धंगेकरांचे सूचक विधान

"सगळं काही पणाला लावलं पण..."; Jain Boarding House चा व्यवहार रद्द झाल्यावर धंगेकरांचे सूचक विधान

Follow Us
Follow Us:

जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहात रद्द करण्याचा ईमेल 
शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी दिली प्रतिक्रिया 
गोखले बिल्डर्सच्या 230 कोटींचे काय होणार

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचा व्यवहार अखेर रद्द करण्याची मागणी ईमेलद्वारे केली आहे. दरम्यान हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केल्यावर रवींद्र धंगेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणात मंत्री मुरलीधर मोहोळांवर आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर विशाल गोखले यांनी ट्रस्टला ईमेल करत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनी व्यवहार प्रकरणात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानंतर विशाल गोखले यांनी आपल्या ईमेलमध्ये आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे मला परत करावेत असा ईमेल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर? 

या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मी जैन समाजाला शब्द दिला होता होस्टेलची एक वीटही काढू देणार नाही.

या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मी जैन समाजाला शब्द दिला होता होस्टेलची एक वीटही काढू देणार नाही.
सगळं काही पणाला लावलं, मागे हटलो नाही…
आज होस्टेलचा व्यवहार रद्द होताना आपल्याला दिसतोय.
-रवींद्र धंगेकर#saveHND #punelandscam pic.twitter.com/fSk05I0xXe — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 27, 2025

सगळं काही पणाला लावलं, मागे हटलो नाही… आज होस्टेलचा व्यवहार रद्द होताना आपल्याला दिसतोय. – रवींद्र धंगेकर

गोखले बिल्डर्सचे 230 कोटी बुडणार

गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला एक ई-मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे.  विशाल गोखले यांनी ईमेल लिहीत जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्टीना जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. काही दिवस आधी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला स्थगिती दिली होती. या व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देखील देण्यात आले होते.

गोखले बिल्डर्सचे Jain Boarding House Land प्रकरणातील 230 कोटी बुडणार; धर्मादाय आयुक्तांचा निर्णय काय?

दरम्यान विशाल गोखले यांनी आपल्या ईमेलमध्ये आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे मला परत करावेत असा ईमेल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर या व्यवहारातून बाहेर पडत असल्याचे ईमेलमध्ये नमूद करण्यात आल्याचे समजते आहे.

बिल्डर विशाल गोखले यांच्या 230 कोटींचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांनी केवळ ईमेल केल्याने हा व्यवहार रद्द होत नाही. झालेल्या करारानुसार हा व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त गोखलेंचे पैसे देण्यास बांधील आहेत की नाहीत याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. दरम्यान धर्मादाय आयुक्त याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारातील 230 कोटी रुपये गोठवण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत ते काढता येणार नाहीत, असे आदेश देण्यात आल्याचे समोर येत आहे.

Web Title: Ravindra dhangekar reply after cancel jain boarding house transaction mohol gokhle builders pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Muralidhar Mohol
  • political news
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.