Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गद्दार’ रवींद्र वर्माला ‘इतक्या’ दिवसांची कोठडी; पाकिस्तानला पुरवत होता सैन्यदलाची महत्वपूर्ण माहिती

रवींद्र वर्माने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील ठिकाणचे आराखडे सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचे  आरोप त्याच्यावर आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2025 | 06:09 PM
‘गद्दार’ रवींद्र वर्माला ‘इतक्या’ दिवसांची कोठडी; पाकिस्तानला पुरवत होता सैन्यदलाची महत्वपूर्ण माहिती
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील कळवा येथून रवींद्र वर्माला अटक केली होती. रवींद्र वर्मा मुंबईच्या नेव्हल डॉकची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आज रवींद्र वर्माला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले आहे. कोर्टाने रवींद्र वर्माला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ठाणे जिल्हा कोर्टाने रवींद्र वर्माला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवींद्र वर्माने नेव्हल डॉक सारख्या महत्वाच्या ठिकाणची माहिती पाकिस्तानला पुरवून देशाशी गद्दारी का केली? पैशांसाठी की त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते याबाबतची चौकशी पोलिसाना करायची आहे.

रवींद्र वर्माने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील ठिकाणचे आराखडे सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचे  आरोप त्याच्यावर आहेत. रवींद्र वर्माने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला १४ पाणबुड्या , जहाजे आणि बेटांची माहिती पुरवली होती, असा आरोप त्याच्यावर आहे.  रवींद्र वर्मा हनीट्रॅपमध्ये अडकला असल्यामुळे तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.

महाराष्ट्र ATS ची पथके थेट ठाण्यात घुसली

हलगाम हल्ला झाल्यानंतर देशभरात सगळीकडेच दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात देखील एटीएसने मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यात ही मोठी कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र एटीएस इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियाशी सबंधित कथित दशतवाद्यांच्या विरुद्ध ही कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ही कारवाई केली आहे. पडघा या भागात ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र दशतवादविरोधी पथक मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे. एटीएसची पथके इसिससही संबंधित असणाऱ्या साकीब नाचणच्या व अन्य संशयितांच्या घरावर देखील छापेमारी केली जात आहे.

महाराष्ट्र ATS ची पथके थेट ठाण्यात घुसली अन्…; वेगवान सर्च ऑपरेशन सुरू, नेमके प्रकरण काय?

सध्या ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती एटीएसने दिलेली नाही. मात्र या कारवाईमुळे सरकारने दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलल्याचे दिसून येत आहे. साकीब नाचण या आधी दोन दहशतवादी प्रकरणात दोषी ठरला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले, मूलुंड येथील बॉम्बस्फोटात तो सहभागी असलत्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

सध्या महाराष्ट्र एटीएस पडघा भागातील बोरिवली गावात मोठे सर्च ऑपरेशन राबवत आहे. त्यामुळे ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्याकडून कोणती माहिती एटीएसला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच या कारवाईत अजून अजून काय  घडामोडी घडतात हे देखील पहावे लागणार आहे.

 

Web Title: Ravindra verma remanded to 3 days police custody on charges of providing information about naval dock to pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Honey trap
  • india
  • pakistan
  • Thane news

संबंधित बातम्या

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
1

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
2

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
3

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
4

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.