महाराष्ट्र एटीएसची ठाण्यात मोठी कारवाई (फोटो- सोशल मिडिया)
ठाणे: पहलगाम हल्ला झाल्यानंतर देशभरात सगळीकडेच दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात देखील एटीएसने मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यात ही मोठी कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र एटीएस इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियाशी सबंधित कथित दशतवाद्यांच्या विरुद्ध ही कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ही कारवाई केली आहे. पडघा या भागात ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र दशतवादविरोधी पथक मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे. एटीएसची पथके इसिससही संबंधित असणाऱ्या साकीब नाचणच्या व अन्य संशयितांच्या घरावर देखील छापेमारी केली जात आहे.
पडघा भागात महाराष्ट्र एटीएसची पथके मोठे सर्च ऑपरेशन राबवत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एटीएसने केलेल्या कारवाईत आतापर्यंत काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते आहे. साकीब नाचण आणि अन्य दशतवाड्यांचा अड्डा समजला जातो.
याआधी देखील या गावातून अनेकदा दशतवादासही सबंधित अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच गावातून एका दशतवादी प्रकरणात १६ जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून हे गाव तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. त्याच प्रकरणातून पुण्यातून काही जणांना अटक करण्यात आली होती.
सध्या ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती एटीएसने दिलेली नाही. मात्र या कारवाईमुळे सरकारने दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलल्याचे दिसून येत आहे. साकीब नाचण या आधी दोन दहशतवादी प्रकरणात दोषी ठरला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले, मूलुंड येथील बॉम्बस्फोटात तो सहभागी असलत्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सध्या महाराष्ट्र एटीएस पडघा भागातील बोरिवली गावात मोठे सर्च ऑपरेशन राबवत आहे. त्यामुळे ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्याकडून कोणती माहिती एटीएसला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच या कारवाईत अजून अजून काय घडामोडी घडतात हे देखील पहावे लागणार आहे.
ज्योती मल्होत्रानंतर ठाण्यात हेरगिरी कनेक्शन उघडकीस
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि एटीएस (दहशतवादविरोधी पथक) यांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. यामध्ये हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता एटीएसने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीनंतर त्यापैकी दोघांना सोडण्यात आले आहे. त्याच वेळी एटीएस एका आरोपीची सखोल चौकशी करत आहे.