Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashwant Co-operative Bank: साताऱ्यातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का; यशवंत बँकेचे व्यवहार तत्काळ बंद

Yashwant Co-operative Bank: यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार झाल्याचा प्रकार ऑक्टोबर २०२५ मध्ये उघडकीस आला होता.

  • By anuradha sagar
Updated On: May 20, 2026 | 11:35 AM
Satara News, Yashwant Co-operative Bank, RBI Action,

Satara News, Yashwant Co-operative Bank, RBI Action,

Follow Us
Follow Us:
  • फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द
  • आर्थिक स्थिती खालावणे, अपुरे भांडवल आणि नियमांचे उल्लंघन ही कारवाईची प्रमुख कारणे
  • बँकेला आता ठेवी स्वीकारणे, पैसे परत करणे किंवा कोणतेही बँकिंग व्यवहार करण्यास मनाई
  • यशवंत बँकेत ११२ कोटींहून अधिक आर्थिक गैरव्यवहार
Yashwant Co-operative Bank: सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का देत रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत जाणे, अपुरे भांडवल, तसेच बँकिंग नियमांचे गंभीर उल्लंघन या कारणांमुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी बँकेचे नियमित व्यवहार संपल्यानंतर हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला. आरबीआयच्या आदेशानुसार आता यशवंत बँकेला ठेवी स्वीकारणे, ठेवी परत करणे किंवा कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकेचे पुढील कामकाज सुरू ठेवणे हे ठेवीदार आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असे निरीक्षणही आरबीआयने नोंदवले आहे.

Mumbai News: ‘थ्री स्टार’ पार्किंग हब उभारण्याची योजना! वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा मास्ट

दरम्यान, सहकार आयुक्त आणि निबंधकांना बँकेच्या अवसायक प्रक्रियेस सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले असून, बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची कार्यवाहीही सुरू होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार झाल्याचा प्रकार ऑक्टोबर २०२५ मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संचालक, अधिकारी आणि नातेवाईक अशा सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात शेखर चरेगावकर यांना अटक करण्यात आली.

बँकेतील आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आतापर्यंत चार वेळा छापेमारी केली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून यशवंत बँकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात होता. आर्थिक गैरव्यवहार, प्रशासकीय अनागोंदी आणि नियमभंगाच्या तक्रारींमुळे बँक आरबीआयच्या रडारवर आली होती.

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा

दरम्यान, भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन बँकेतील कथित गैरव्यवहाराकडे लक्ष वेधले होते. सामान्य ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर तपास आणि प्रशासकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पात्र ठेवीदारांना ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) अंतर्गत विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठेवीदारांना नियमानुसार विमा मर्यादेपर्यंत रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Web Title: Rbi cancels yashwant co operative bank license after alleged 112 crore scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Bank Fraud
  • RBI news
  • Satara News

संबंधित बातम्या

वाई पालिकेचा भोंगळ कारभार उघड! निकृष्ट दर्जाच्या ‘नो पार्किंग’ फलकांवर लाखोंचा खर्च? विरोधकांचे मौन संशयास्पद
1

वाई पालिकेचा भोंगळ कारभार उघड! निकृष्ट दर्जाच्या ‘नो पार्किंग’ फलकांवर लाखोंचा खर्च? विरोधकांचे मौन संशयास्पद

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
2

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

येरळवाडी धरणात फक्त 25 टक्के मृत पाणी साठा शिल्लक; वडूजसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर
3

येरळवाडी धरणात फक्त 25 टक्के मृत पाणी साठा शिल्लक; वडूजसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी
4

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.