Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी

दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटी बस पकडण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबवण्यासाठी पालकांनी शाळेसमोर बस थांबा सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी मेढा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले असून, उपसभापती गोरख महाडिक यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 12:38 PM
जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवे

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवे

Follow Us
Follow Us:

पाचगणी: जावळी तालुक्यातील दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना एसटी प्रवासासाठी करावी लागणारी पायपीट आणि कसरत थांबवण्यासाठी आता पालक वर्ग आक्रमक झाला आहे. शाळेसमोर नवीन बस थांबा मंजूर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शाळा प्रशासन आणि पालकांच्या वतीने मेढा आगार प्रमुखांना नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले. या गंभीर समस्येची दखल घेत जावळी पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाकडे तातडीने पाठपुरावा सुरू केला आहे.

​वाई – करहर या मुख्य मार्गावर दापवडी हा मुख्य थांबा असून, त्याच्या पुढील अंतरावर वहागाव हा बस थांबा आहे. मात्र, या दोन थांब्यांच्या अगदी मधोमध श्री दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय आहे. या हायस्कूलमध्ये परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने मुलींची संख्या मोठी आहे. शाळा सुटल्यानंतर हक्काची एसटी गाडी पकडण्यासाठी या विद्यार्थ्यांना दापवडी किंवा वहागाव या दोन्ही थांब्यांवर धावपळ करत जावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होत असून, मुख्य रस्त्यावरून जाताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

​वहागाव थांब्याऐवजी हायस्कूलसमोर थांबा देण्याची मागणी

पालकांनी निवेदनात एक अत्यंत व्यावहारिक पर्याय सुचवला आहे. वहागाव येथील बस थांब्यावर सध्या प्रवाशांची संख्या नगण्य असते, तिथून फारसे कोणीही प्रवास करत नाही. त्यामुळे तो निरुपयोगी ठरत असलेला थांबा थेट हायस्कूलच्या समोर शिफ्ट (स्थलांतरित) करण्यात यावा. यामुळे शासनाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही आणि शेकडो विद्यार्थिनींना शाळेच्या दारातच सुरक्षितपणे एसटी बस उपलब्ध होऊ शकेल.

Satara News: माऊलींच्या पालखी स्वागतासाठी सातारा पोलीस सज्ज; महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा

​मुलींना सुरक्षित घरी पोहोचवणे ही आपली जबाबदारी : उपसभापती गोरख महाडिक

या संवेदनशील विषयावर जावळीचे उपसभापती गोरख महाडिक यांनी पालकांना पूर्ण पाठबळ दिले आहे. त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देताना त्यांच्या प्रवासाची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्या मुलींना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे ही समाजातील आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून पंचायत समितीच्या वतीने आम्ही तात्काळ पावले उचलली असून, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे. दापवडी हायस्कूलसमोरील थांब्याबाबत लवकरच अधिकृत आणि ठोस कार्यवाही केली जाईल.”

​शाळेसमोरील या थांब्याला मंजुरी मिळेपर्यंत आणि एसटी प्रत्यक्ष थांबण्यास सुरुवात होईपर्यंत या लढ्यात पालकांसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्धार लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आता मेढा आगार प्रशासन यावर किती जलद गतीने निर्णय घेते, याकडे संपूर्ण जावळी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Saswad News: सासवड-वाघापूर रस्त्यावर मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढेंच्या धसक्याने बेकायदेशीर कृत्य?

Web Title: Dapwadi school bus stop demand javali parents submit memorandum medha depot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Pachgani
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
1

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
2

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
3

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी
4

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.