Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: बाजार समितीत बेदाण्याची विक्रमी आवक! ४०० रुपयांपर्यंत दराची झेप; १५ हजार ४६२ बॉक्स दाखल

परवानाधारक व्यापारी मालाची पाहणी करून गुणवता, रंग, आकार आणि ओलावा यानुसार बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्याला माल विकला जातो. शेतकऱ्याला मिळालेला दर मान्य असल्यास व्यवहार निश्चित केला जातो. उत्तम दर्जाच्या बेदाण्याला अधिक दर मिळतो, तर दर्जानुसार दरात चढ-उत्तार होत असतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 01:45 PM
बाजार समितीत बेदाण्याची विक्रमी आवक! ४०० रुपयांपर्यंत दराची झेप; १५ हजार ४६२ बॉक्स दाखल

बाजार समितीत बेदाण्याची विक्रमी आवक! ४०० रुपयांपर्यंत दराची झेप; १५ हजार ४६२ बॉक्स दाखल

Follow Us
Follow Us:

सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा लिलावाला मोठा प्रतिसाद मिळत असून गुरुवारी झालेल्या लिलावात एकूण १५ हजार ४६२ बॉक्स, म्हणजेच सुमारे २३२ टन बेदाण्याची आवक झाली. बाजारपेठेत उत्तम दर्जाच्या मालाला चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आवक झालेल्या १५ हजार ४६२ बॉक्सपैकी १० हजार ३९५ बॉक्स बेदाण्याची यशस्वी विक्री झाली, तर सुमारे ७६ टन माल अविक्रीत राहिला. गुरुवारच्या लिलावात बेदाण्याला प्रतिकिलो किमान १०० रुपये, सर्वसाधारण २८० रुपये आणि कमाल ४०० रुपये असा दर मिळाला. सोलापूर ग्रामीण भागासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर तालुक्यांतील शेतकरी तसेच कर्नाटकातील लच्चाण आणि इतर गावांतील उत्पादकही चांगल्या दराच्या अपेक्षेने आपला बेदाणा विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणत आहेत.(फोटो सौजन्य – istock)

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने चाकण शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याचा लिलाव खुल्या बोली पद्धतीने घेतला जातो. शेतकरी बाजार समितीत माल आणल्यानंतर त्याची प्रतवारी (ग्रेडिंग) केली जाते. त्यानंतर परवानाधारक व्यापारी मालाची पाहणी करून गुणवता, रंग, आकार आणि ओलावा यानुसार बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्याला माल विकला जातो. शेतकऱ्याला मिळालेला दर मान्य असल्यास व्यवहार निश्चित केला जातो. उत्तम दर्जाच्या बेदाण्याला अधिक दर मिळतो, तर दर्जानुसार दरात चढ-उत्तार होत असतात.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याचा लिलाव पारदर्शक पद्धतीने केला जातो. शेतकरी किवा व्यापारी बेदाणा विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. त्यानंतर मालाची प्रतवारी (ग्रेडिंग) व तपासणी केली जाते. या लिलावात दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथील प्रगतशील शेतकरी राहुल व्हनमाने यांच्या बेदाण्याने उच्चांकी दराचा मान पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या ५६ बॉक्सच्या बेदाणा लॉटला बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाल्याची माहिती देण्यात आली.

Ashadhi Ekadashi 2026: ग्लोबल दिंडी’ पंढरपूरच्या वाटेवर! युरोप ते पंढरी… २५ जुलैला दाखल होणार परदेशी वारी

6 बाजार समितीत बेदाण्याला सातत्याने चांगला दर मिळत असल्यामुळे जिल्ह्यासह शेजारच्या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल येथे विक्रीसाठी आणत आहेत, असे मत दिलीपराव माने, सभापती, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Record raisin arrivals at market committee prices surge to rupees 400 as 15 462 boxes reach the yard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
1

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Devendra Fadnavis: सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
2

Devendra Fadnavis: सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’
3

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
4

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.