Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना

मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना सकारात्मक बदल दिसेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 11:30 AM
कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना

कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना

Follow Us
Follow Us:

मुंबईतील रस्ते दुभाजक, पदपथ दुरुस्ती, दगडी कडा बसवणे यांसारखी दैनंदिन व लहान-मोठी देखभाल-दुरुस्तीची कामे कंत्राटदारांना न देता पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाचा वापर करूनच पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करून पालिकेच्या आस्थापनेवरील कामगारांचा अधिक प्रभावी व कार्यक्षम वापर करावा, असेही त्यांनी बजावले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai Hospital News: सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले ‘कृष्ण’ लॉकेट, डॉक्टरांनी एंडोस्कोपीतून वाचवला जीव

महापालिकेच्या परिरक्षण चौक्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, अभियंत्यांकडून योग्य पर्यवेक्षण होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, कीटकनाशक आणि परिरक्षण चौक्यांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.

जबाबदारी चोख निभवा

मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना सकारात्मक बदल दिसेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.सर्व २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील परिरक्षण चौक्यांमधील मनुष्यबळाचा सखोल आढावा घेऊन क्षेत्रनिहाय कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.या पाहणी दौऱ्यादरम्यान उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले उपस्थित होते.

‘के पश्चिम’ विभागातील नेहरूनगर परिसरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कीटकनाशक विभागाने या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून डासांची उत्पत्तीस्थाने तातडीने नष्ट करावीत, तसेच डास प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले.

NCP Politics: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे आक्रमक, पार्थ पवार अचानक उठून गेले; नेमकं घडलं काय?

चौक्यांच्या पाहणीनंतर आयुक्तांनी इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गझदरबांध उदंचन (पम्पिंग) केंद्राला भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. जुहू येथील इर्ता पर्जन्यजल उदंचन केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले; जेणेकरून मीलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक आणि जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळेल. तसेच जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी ‘बँक / फ्रंट बार स्क्रीन’ या यांत्रिक जाळी प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Reduce dependence on contractors instructions of the commissioner of mumbai municipal corporation instructions made after inspection of various checkpoints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • Maharashtra Road
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
1

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
2

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
3

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
4

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.