Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईतील वाहतूक समस्येवर तोडगा! विद्याविहार, मानखुर्द हे दोन महत्त्वाचे मोठे उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्यावर भर

मानखुर्द - महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमितपणे सकाळी आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे स्थानिक रहिवाशांसह मुंबई-वाशी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 01:45 PM
मुंबईतील वाहतूक समस्येवर तोडगा! विद्याविहार, मानखुर्द हे दोन महत्त्वाचे मोठे उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्यावर भर

मुंबईतील वाहतूक समस्येवर तोडगा! विद्याविहार, मानखुर्द हे दोन महत्त्वाचे मोठे उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्यावर भर

Follow Us
Follow Us:

मुंबईतील वाहतूककोंडीतून दिलासा देण्यासाठी, महापालिकेने विद्याविहार आणि मानखुर्द महाराष्ट्र नगर या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांचे बांधकाम गतिमान करण्याचा सतत वाढणाऱ्या निर्णय घेतला आहे. विद्याविहार उड्डाणपूल ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत, तर मानखुर्द-महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाचे दोन्ही भाग ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मुदतीचे पालन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे, तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. बांगर यांनी शनिवारी सकाळी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळांना भेट देऊन कामाचा आढावा घेत कामाला गती देण्याचे निर्देश दिले.(फोटो सौजन्य – AI)

मुंबईतील वृक्षगणनेच्या ‘डेटा’ देखभालीत घोटाळा? ‘सार्क आयटी’ला दिले झुकते माप, प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता

प्रकल्पस्थळी कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सक्त निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मानखुर्द – महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमितपणे सकाळी आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे स्थानिक रहिवाशांसह मुंबई-वाशी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक होणार गतिमान

प्रस्तावित आराखड्यानुसार, आर्म-१ हा १,४२० मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा २ लेनचा मार्ग असेल, तर आर्म-२ हा दुसऱ्या स्तरावरील १,९५१ मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा २ लेनचा उड्डाणपूल असेल. या दोन्ही पुलांमुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष सुरू झालेल्या या प्रकल्पाचे सद्यस्थितीला सुमारे ३३ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाहणी दरम्यान बांगर यांनी प्रकल्पाच्या आड येणाऱ्या महावितरण व टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामाचीही पाहणी केली.

अतिरिक्त आयुक्तांनी विद्याविहार पूल प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणाऱ्या या एकूण ६५० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम आतापर्यंत सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून, हे काम ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटरचा मुख्य पूल, पूर्व बाजूला २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटरचा पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. तसेच या पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग दिला जात आहे.

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

हा पूल सुरू झाल्यानंतर पूर्व व पश्चिम पोहोच रस्त्यांवर भविष्यात कोणतीही वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पालिकेच्या ‘एन’ विभागाचे अधिकारी, उद्यान विभाग आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय साधून सुनियोजन करण्याचे आदेश बांगर यांनी दिले. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतुकीस अडथळा ठरणारी ठिकाणे, पदपथ, झाडे व इतर आस्थापनांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: A solution to mumbais traffic woes focus on the timely completion of two major flyovers at vidyavihar and mankhurd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Bad Roads
  • Maharashtra Road
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय…’; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र
1

‘आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय…’; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे
2

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू
3

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार
4

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.