Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवराष्ट्र’ने दिलेली बातमी खरी ठरली; अखेर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नामकरण, आता ‘या’ नावाने जाणार ओळखले

पुण्यातील बहुचर्चित व गुन्हेगारीचे (Pune Crime) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्याचे (Dattawadi Police Station) अखेर नामकरण झाले आहे. आता यापुढे पर्वती पोलीस ठाणे (Parvati Police Station) असे नाव असणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2023 | 01:05 PM
‘नवराष्ट्र’ने दिलेली बातमी खरी ठरली; अखेर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नामकरण, आता ‘या’ नावाने जाणार ओळखले
Follow Us
Follow Us:

पुणे / अक्षय फाटक : पुण्यातील बहुचर्चित व गुन्हेगारीचे (Pune Crime) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्याचे (Dattawadi Police Station) अखेर नामकरण झाले आहे. आता यापुढे पर्वती पोलीस ठाणे (Parvati Police Station) असे नाव असणार आहे. शासनाने याबाबत आदेश नुकतेच पारित केले असून, लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने नामकरणासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. पर्वती टेकडीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शहर पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी दत्तवाडी हे एक पोलीस ठाणे मानले जाते. सर्वाधिक मोठी झोपडपट्टी जनता वसाहत या पोलीस ठाण्याअंतर्गत येते. गुन्हेगारीचे माहेर घर म्हणून पोलीस ठाण्यास ओळखले जात असत. परंतु, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या पोलीस ठाण्याने गुन्हेगारीच्या बाबतीत शांतता निर्माण केली आहे. तत्पूर्वी 2008 साली हे पोलीस ठाणे सुरू झाले. स्वारगेट पोलीस ठाण्याची व्याप्ती आणि वाढते गुन्हे लक्षात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभाजन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. चार पोलीस चौकींचा परिसर असलेल्या या ठाण्यात 12 अधिकारी व 87 पोलीस अंमलदार कार्यरत आहेत.

दत्तवाडी पोलीस ठाणे झाल्यानंतर मात्र, दत्तवाडी पोलीस चौकी व दत्तवाडी पोलीस ठाणे या नामसार्धम्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असत. त्यांचा या नावाला विरोध होता. लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय व प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले. पर्वती परिसरात हे ठाणे असताना त्याचे नाव दत्तवाडी ठेवण्यात आले होते. त्यासोबतच दत्तवाडी म्हंटल की अनेकजन दत्तवाडी पोलीस चौकीला जात असत. तसेच, घटना पर्वती, लक्ष्मीनगर, जनता वसाहत वा इतर ठिकाणी घडली तरीही दत्तवाडीत घडली असे होत. त्यामुळे दत्तवाडीचे रहिवाशी देखील यामुळे नाराज होते. विनाकारण बदनामी होते.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून याबाबतचा पत्र व्यवहार प्रशासन व गृहविभागाकडे केला जात होता. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने शासनाने दत्तवाडीचे पर्वती पोलीस ठाणे असे नामकरण केले आहे.

पर्वती पोलीस ठाणे

दत्तवाडी पोलीस ठाणे पर्वती परिसरात तर आहेच पण, ते पर्वतीच्या पायथ्याला आहे. ऐतिहासिक पर्वती टेकडी व मंदिर यामुळे त्याचे नाव पर्वती असेच असावे, अशी आग्रही मागणी होती. सर्व पोलीस ठाणी हे त्या-त्या परिसराच्या नावाने ओळखले जातात व त्यांची नावेही तशीच आहेत. के‌वळ हेच ठाणे वेगळ्या नावाने होते.

‘नवराष्ट्र’ने दिली होती पहिली बातमी..!

लक्ष्मीनगर रहिवाशी संघाने पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर ‘नवराष्ट्र’ वृत्तपत्राने त्यांच्या या मागणीला प्रसिद्धी दिली होती. तर या मागणीला देखील पाठिंबा दर्शवला होता. 17 जानेवारी 2022 मध्ये याबाबतची पहिली बातमी देत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलणार या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Web Title: Renaming of dattawadi police station now it identify as parvati police station nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2023 | 01:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Pune Police News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.