Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Sangli Accident: रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज दूरवर पोहोचल्याने आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. अपघातानंतर घाटातील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 08:08 PM
रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Follow Us
Follow Us:
  • रेणावी घाटात काळाचा घाला!
  • दोन एसटींची जोरदार धडक
  • तिघांचा मृत्यू; १९ जखमी
विटा : विटा-भिवघाट रस्त्यावरील रेणावी घाटातील मुख्य वळणावर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार तिघांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

विट्याहून भिवघाटकडे जाणारी एसटी आणि कर्नाटकातील विजापूरहून विटामार्गे मेढ्याकडे जाणारी एसटी बस रेणावी घाटातील मुख्य वळणावर समोरासमोर आली. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती की, वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेला. त्यामुळे आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

अपघातानंतर काही काळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिक, पोलिस, प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी मदतकार्यात उतरल्याने जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली.

अपघातामुळे विटा-भिवघाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बस रस्त्यावरच असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि बराच काळ वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू होती.

मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू

अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. नेमकी धडक कशामुळे झाली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताची तीव्रता पाहता जखमींची संख्या तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून पुढील माहिती घेण्याचे काम सुरू होते.

Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव

Web Title: Renavi ghat st bus head on collision 3 killed 19 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Accident
  • Sangli
  • st bus

संबंधित बातम्या

Sangli News: पुनर्वसन केल्याशिवाय हटणार नाही! सांगलीत हातगाडी चालक आक्रमक
1

Sangli News: पुनर्वसन केल्याशिवाय हटणार नाही! सांगलीत हातगाडी चालक आक्रमक

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान
3

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान

Sangli News: सांगली महापालिकेतील ३५ कोटींच्या भूखंड घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले
4

Sangli News: सांगली महापालिकेतील ३५ कोटींच्या भूखंड घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.