Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

आता वाळु, खनिज माफियांकडून थेट दहापट दंड वसुल होणार असुन, अनधिकृत वाहतूक आढळल्यास एकूण रॉयल्टी रकमेच्या १० पट दंड भरावा लागेल. यासाठी उमरखेड तालुक्यातील संशयास्पद उत्खनन स्थळांवर महसूल पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 11:45 AM
नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

Follow Us
Follow Us:

यवतमाळमध्ये पैनगंगा नदीपात्र आणि ग्रामीण भागातील टेकड्यांमधून मुरुम तसेच वाळूची अहोरात्र लूट करणाऱ्या माफियांना चाप लावण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार आता अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना पकडल्यास थेट रॉयल्टीच्या दहापट दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे महसूल विभागाकडुन अॅक्शनमध्ये आले असुन. यामुळे उमरखेड तालुक्यातील वाळू आणि मुरुम माफियांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाच्या नव्या दंडप्रणालीने खनिज चोरी करण्यासाठी कारनामे करणाऱ्यांची त्रेधा तिरपड पूर्वी शिथिल नियमांचा फायदा घेत माफिया प्रशासनाला जुमानत नव्हते. पूर्वी ३ ते ५ पट दंड असल्याने गुन्हेगार सहज रक्कम भरून पुन्हा तोच बेकायदेशीर व्यवसाय सुरू करायचे. पैनगंगा नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधारात राजरोसपणे शेकडो ब्रास वाळू उपसली जात होती. तर तालुक्यातील शासकीय जमिनींवर मुरुमाचे डोंगर पोखरले गेले. मात्र मऊ धोरणाने शासनाचा महसूल बुडुन पर्यावरणाची हानी होत होती. मात्र, आता थेट १० पट दंडाची तरतूद झाल्याने माफियांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal New: थकबाकीच्या बोझ्यात शहराचा विकास! नगर परिषद-एमजेपीच्या आर्थिक कोंडीत शहराचे रस्त्यांची दुरवस्था

टँकरमुक्त उमरखेडसाठी नवा दंडनिर्णय संजीवनी ठरणार

मागील काही वर्षांत पैनगंगा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने नदी पात्र बदलले आहे. तर भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. उन्हाळ्यात उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नदीतील वाळू पाण्याचा साठा करून ठेवते, पण माफियांनी नदी संपूर्ण उघडी बोडकी केली. आता नव्या आणि कडक नियमांमुळे बेकायदेशीर उपशाला पूर्णपणे लगाम बसुन नदीचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल, अशी आशा पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहे.

तालुक्यात स्थानिक पातळीवर काही बड्या धेंड्यांच्या आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर हे अवैध जाळे फोफावले होते. महसूल विभागाने आता उमरखेड, ढाणकी आणि विदर्भ-मराठवाडा सीमेवरील पैनगंगेच्या घाटांवर विशेष गस्त पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दंडच नव्हे, तर बेकायदेशीर वाहतूक करणारी हायवा, ट्रॅक्टर आणि पोकलेन मशीन यांसारखी महागडी वाहने थेट जप्त करून ती राजसात केली जाणार आहेत.

आता वाळु, खनिज माफियांकडून थेट दहापट दंड वसुल होणार असुन, अनधिकृत वाहतूक आढळल्यास एकूण रॉयल्टी रकमेच्या १० पट दंड भरावा लागेल. दंडात्मक कारवाईमुळे आणि अधिकृत परवान्यांमुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडणार असुन उमरखेड तालुक्यातील संशयास्पद उत्खनन स्थळांवर महसूल पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे.

Yavatmal News: वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८३ पदे अद्यापही रिक्त! डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर वाढला ताण

6 करण तालुक्यात पैनगंगा आता प्राथमिकता आहे. यापुढे वाळू किंवा मुरुमाचा कणही बेकायदेशीरपणे उचलल्यास संबंधितांना सोडले जाणार नाही. नव्या नियमाने थेट रॉयल्टीच्या १० पट दंड वसूल केला जाईल. गुन्हेगारांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हे दाखल करून वाहने कायमची जप्त होतील. कोणत्याही दबावाला बळी न पडता तालुक्यात ही मोहीम राबवली जाईल, अशी माहिती आर. यु. सुरडकर तहसीलदार, उमरखेड यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: River sand mafia now on the radar action for penalty of ten times the royalty government crackdown on illegal mining

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • maharashtra
  • Yavatmal
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
3

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.