Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळरान तुडवत रोहित पाटलांची सिंचन योजनांची पाहणी; पंपहाऊसपासून पाइपलाइनपर्यंत घेतला आढावा

Rohit Patil Inspection Tembhu Irrigation Project : तासगाव-कवठेमहांकाळच्या दुष्काळी भागाला टेंभू योजनेचे पाणी मिळावे, यासाठी आ. रोहित आर. आर. पाटील यांनी विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्याची दोन दिवस प्रत्यक्ष पाहणी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 09:08 PM
माळरान तुडवत रोहित पाटलांची सिंचन योजनांची पाहणी; पंपहाऊसपासून पाइपलाइनपर्यंत घेतला आढावा
Follow Us
Follow Us:
  • रोहित पाटलांची सिंचन योजनांची पाहणी
  • पंपहाऊसपासून पाइपलाइनपर्यंत घेतला आढावा
  • अधिकारी, शेतकऱ्यांशी थेट संवाद
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळच्या दुष्काळी पट्ट्याला टेंभूचे पाणी मिळावे, यासाठी आ. रोहित आर. आर. पाटील यांनी गेल्या दोन दिवसांत माळरान तुडवत विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी केली. खानापूर तालुक्यातील भुड येथील पंपहाऊसपासून सुरू झालेला पाहणी दौरा जरंडी, तिसंगी, घाटनांद्रे, वाघोली, गर्जेवाडीमार्गे कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडीपर्यंत झाला.

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

पंपहाऊस, पाइपलाइन आणि विविध पॉईंटची पाहणी करत आ. पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनेचा मार्ग, पाण्याचा प्रवाह आणि लाभक्षेत्राची माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी पाइपलाइनचा नकाशा जागेवर दाखवत प्रत्येक पॉईंटची माहिती दिली. यावेळी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षाही जाणून घेण्यात आल्या. केवळ वाहनातून प्रमुख ठिकाणांची पाहणी न करता माळरानातून प्रत्यक्ष फिरत पाइपलाइनचा मार्ग, भौगोलिक परिस्थिती आणि संभाव्य अडचणी समजून घेण्यावर आ. पाटील यांनी भर दिला. त्यामुळे योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे आणि आवश्यक उपाययोजनांचा जागेवरच आढावा घेता आला.

विस्तारित टेंभूच्या पाचव्या टप्प्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी जानेवारीपासून पाठपुरावा सुरू असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. कामाला गती देऊन सप्टेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पुढे नेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. निधी, तांत्रिक अडचणी आणि कामाची गती या बाबींवर मंत्रालयीन पातळीवर तसेच विधिमंडळात पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सावळजसह तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा सिंचनापासून वंचित गावांचा विस्तारित टेंभू योजनेत समावेश व्हावा, यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनानंतर वंचित गावांच्या समावेशाला मान्यता मिळाली.दरम्यान, मागील आठवड्यात आ. पाटील यांनी विस्तारित टेंभूच्या सहाव्या टप्प्याचीही पाहणी केली होती. नरसेवाडी, मांजर्डे, गौरगावसह लाभक्षेत्रातील पाइपलाइन आणि विविध पॉईंटचा त्यांनी आढावा घेतला.

मान्यता मिळालेल्या योजनेचे पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे हे आता प्रमुख उद्दिष्ट आहे. दोन दिवसांच्या पाहणीमुळे पाण्याचा मार्ग, तांत्रिक अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांमध्ये थेट संवाद झाला असून, टेंभूच्या पाण्याबाबत वंचित भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाली आहे.

आ. रोहित पाटील म्हणाले…

विस्तारित टेंभूच्या पाचव्या व सहाव्या टप्प्यांतर्गत पंपहाऊस, पाइपलाइन मार्ग, विविध पॉईंट व लाभक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अडचणींचा आढावा घेतला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मधील सिंचनापासून वंचित शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी निधी, प्रशासकीय मान्यता आणि कामाची गती या तिन्ही पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मंत्रालयीन पातळीवर तसेच विधिमंडळात हा प्रश्न लावून धरला असून, लवकरच या प्रयत्नांना ठोस यश मिळेल, असा विश्वास आहे.

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

Web Title: Rohit patil tembhu irrigation project inspection tasgaon kavathe mahankal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • MLA Rohit Pawar
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा
1

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
2

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.