Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ समोर आणला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2025 | 05:22 PM
Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
Follow Us
Close
Follow Us:

1. माणिकराव कोकाटे यांची रोहित पवारांना मानहानीची नोटीस
2. ऑनलाईन रमी खेळताना कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल
3. त्या प्रकरणात कोकाटे यांच्यावर विरोधकांची जोरदार टीका

राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीच हा व्हिडीओ समोर आणला होता. त्यानंतर आता माजी कृषीमंत्री आणि विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना नोटीस पाठवली आहे.  दरम्यान आता यावर रोहित पवारांनी देखील भाष्य केले आहे.

रोहित पवारांचे ट्वीट काय?

माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही.

 

 

माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती… pic.twitter.com/jZhq2phiK1 — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2025

तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल.

Manikrao Kokate: राजीनामा नाहीच? ऑनलाईन रमी खेळल्याने मिळणार ‘क्रीडा’ खातं, काय येणार कोकाटेंच्या नशिबी?

ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कोकाटे चांगलेच वादात सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांचा क्लास घेत चांगलीच तंबी दिल्याचे म्हटले जात होते. . त्यामुळे विरोधकांच्या मागणीनंतर व समोर आलेला व्हिडीओ, वादग्रस्त विधाने अशा सर्व गोष्टीनंतर देखील माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यांच्याकडे असलेला कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात अल. तो कारभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आला. तर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खात्याचा कारभार देण्यात आला आहे. मात्र आता कोकाटे यांनी रोहित पवार यांना नोटीस पाठवल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Web Title: Rohit pawar reply to manikrao kokate legal notice about online rummy case maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
1

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर
2

Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

‘प्रशासनाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा विसर, ही गंभीर बाब’; सुप्रिया सुळे यांचं विधान
3

‘प्रशासनाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा विसर, ही गंभीर बाब’; सुप्रिया सुळे यांचं विधान

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; शरद पवार गटात दुफळी तर ठाकरे गटात…
4

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; शरद पवार गटात दुफळी तर ठाकरे गटात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.