Rohit Pawar on Manikrao Kokate: राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीच हा व्हिडीओ समोर आणला होता.या प्रकरणात विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर गुरूवारी (३१ जुलै) त्यांची कृषीमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेले क्रिडा आणि युवक कल्यण खात्याचा पदभार कोकाटे यांच्याकडे देण्यात आला, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषीखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण यानंतरआता पुन्हा रोहित पवार यांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत कोकाटेंच्या खातेबदलावर निशाणा साधला आहे. ” कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती.
Trump Tariff: भारतासह सर्व देशांवरील ट्रम्प टॅरीफची ‘इडापिडा’ टळली? Pakistan वर मोठे उपकार
सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच, “कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा!”असंही त्यांनी म्हटलं आहे.
Share Market Today: आठवड्याच्या शेवटीही बाजारात होणार घसरण? गुंतवणूकदार १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत
त्याचवेळी, ‘रमी’राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ट्विटर एक्सवरूनही कोकाटेंच्या खातेबदलावरून निशाणा साधला आहे.”महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो, अथवा न मिळो. मात्र, महायुतीमधील मंत्र्यांच्या कला-गुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘रमी’राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन,” अशा शब्दांत माणिकराव कोकाटे यांना टोला लगावला आहे.