Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS For BJP: प्रचारक ते संयुक्त महासचिव; महायुतीच्या विजयाचे शिल्पकार, संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?

RSS: अतुल लिमये हे सुरुवातीला महाराष्ट्रात, रायगड आणि कोकण प्रांतात काम करत होते. त्यानंतर त्यांना देवगिरी प्रांत, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2024 | 02:24 PM
RSS For BJP: प्रचारक ते संयुक्त महासचिव; महायुतीच्या विजयाचे शिल्पकार, संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?

RSS For BJP: प्रचारक ते संयुक्त महासचिव; महायुतीच्या विजयाचे शिल्पकार, संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024: महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश संपादन केले आहे. महायुतीने 288 जागांपैकी एकूण 230  जागा जिंकत घवघवीत बहुमत प्राप्त केले आहे. तर एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे भाजपने विधानसभेत सूक्ष्म नियोजनवर भर दिला. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मायक्रो प्लॅनिंग कामी आल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये संघाचे  अतुल लिमये यांच्या योग्य नियोजनामुळे भाजपला यश प्राप्त झाल्याचे म्हटले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. जो निकाल समोर आला ते पाहून ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे म्हटले जाते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला नियोजनबद्ध मदत केल्याचे समोर येत आहे. हे सगळे नियोजन संघाच्या अतुल लिमये यांनी केल्याचे म्हटले जात आहे. अतुल लिमये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत.

कोण आहेत अतुल लिमये?

अतुल लिमये  हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आखलेल्या कुशल रणनीतीमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जाते. अतुल लिमये हे गेले अनेक वर्षे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. त्यांनी ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण वेळ संघासाठी प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कुशल आणि सूक्ष्म नियोजन केले, त्यामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

अतुल लिमये हे सुरुवातीला महाराष्ट्रात, रायगड आणि कोकण प्रांतात काम करत होते. त्यानंतर त्यांना देवगिरी प्रांत, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. ते सह प्रांत प्रचारक होते. 2014 च्या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र , गुजरात आणि गोवा प्रांताची व्यापक जबाबदारी देण्यात आली. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची सखोल जाण असल्याने, तसेच अगदी तळगाळापर्यंत संपर्क असल्याने उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांचे समोर आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी लिमये यांनी नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस व संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाह जवळून काम केले. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून ‘या’ नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

फडणवीसांची विजयाची हॅट्ट्र्रिक

देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Web Title: Rss atul limaye micro planning sucess to mahayuti and bjp get majority at maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 02:22 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • RSS

संबंधित बातम्या

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन
1

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
2

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार
3

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
4

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.