Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS ने दिला स्वदेशीचा नारा…! टॅरिफ वॉर अन् शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

मोहन भागवत यांनी नागपूरच्या रेशीमबागेमधून संघशताब्दी वर्षानिमित्त भाषण दिले. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले असून टॅरिफ वॉरमुळे स्वावलंबन आणि स्वदेशीचा नारा दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 02, 2025 | 12:35 PM
RSS 100 Years Mohan Bhagwat Speech at Reshimbagh Nagpur

RSS 100 Years Mohan Bhagwat Speech at Reshimbagh Nagpur

Follow Us
Close
Follow Us:

RSS100Years : नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा पार पडला आहे. आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने नागपूरमधील रेशमीबागेमध्ये दरवर्षीप्रमाणे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नागपूरमधील रेशीमबागेमध्ये संघाचा सोहळा पार पडला असून यावेळी शस्त्रपूजन आणि संचलन करण्यात आले. या कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांना नमन केले. संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने शस्त्र पूजन केले. या विजयादशमी उत्सवात घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके, यूएसए यांसारख्या विविध देशांतील अनेक विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले आहेत.

संघाच्या शताब्दीच्या या उत्सवामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या तरुणांना प्रोत्साहन केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, टॅरिफ वॉर आणि शेजारील देशांमध्ये असणारी अराजकता अशा सर्वच विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की,  हिंदू समाज हा या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज आहे, हिंदू समाज सर्वसमावेशक आहे. वर उल्लेख केलेली विविध नावे, रूपे पाहता, स्वतःला वेगळे मानणे आणि मानवांमध्ये विभाजन किंवा वियोग निर्माण करणे, हिंदू समाज’ आपण आणि ते’ या मानसिकतेपासून मुक्त आहे, मुक्त राहील. हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या सर्वसामावेशी विचारसरणीचा प्रवर्तक तथा संरक्षक आहे. म्हणूनच, भारताला समृद्ध बनवणे, संपूर्ण जगाला त्याचे अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. जगाला एक नवीन मार्ग दाखवू शकणाऱ्या धर्माचे रक्षण करताना, भारताला समृद्ध बनवण्याच्या संकल्पाने, संघ आपल्या संघटित कार्यबलाद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे,असे मत मोहन भागवत यांनी व्यक्तकेले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादला आहे. याबाबत देखील मोहन भागवत यांनी भाष्य करत स्वदेशीचा नारा दिला. ते म्हणाले की, नुकतंच अमेरिकेनं जाहीर केलेले धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. टॅरिफचा फटका सर्वांना बसत आहे. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असेल. परंतु, त्याचा इतर सर्वांनाच फटका बसतोय. त्यामुळे आपण इतर देशांवर अवलंबून राहून चालणार नाही. जग हे परस्पर अवलंबनावर चालतं, सगळ्यांनाच एकमेकांशी संबंध ठेवावे लागतात. परंतु, हे अवलंबन लाचारीत रुपांतरित होता कामा नये. त्यामुळेच जगात परस्पर संबंध निर्माण करणे आवश्यक आहे, कारण आपण एकटे जगू शकत नाही.”, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आर्थिक प्रणाली कधी बदलेल काही सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल, त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं जतन करावं लागेल, पण त्यात नाईलाज नसावा, सक्ती नसावी, आपली इच्छा असायला हवी. पण ही निर्भरता नाईलाज बनू नये. त्यामुळे आपल्याला या गोष्टीला मजबुरी न बनवता, आत्मनिर्भर होऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे, अशा भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Rss completed 100 years mohan bhagwats speech at reshimbagh nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • Nagpur RSS
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा
1

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात
2

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
3

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले
4

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.