Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?

रेवती सुळे यांच्या लग्नावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. भाजप आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीवरून झालेल्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 06:47 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • रेवती सुळे यांच्या लग्नाबाबत सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य केले.
  • ‘सारंग आणि रेवती आनंदी आहेत तर मी आनंदी आहे,’ अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
  • रेवतीच्या सासरच्या कुटुंबाच्या राजकीय संबंधांवरही त्यांनी भाष्य केले.
 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलगी रेवती सुळे हिच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. त्यानंतर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या खास रिसेप्शनलाही देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.

या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिसेप्शनमध्ये सुमारे 20 मिनिटे उपस्थिती लावल्याची माहिती आहे. या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि शरद पवार एकत्र गप्पा मारताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

‘रेवतीचे सासरे आरएसएसच्या अत्यंत जवळचे’

दरम्यान, अभिनेत्री सोहा अली खानच्या ‘All About Her’ या पॉडकास्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी रेवतीच्या लग्नाबाबत भाष्य केले. सोहा अली खानने रेवतीने भाजपच्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत लग्न केल्याबाबत प्रश्न विचारला. यावर सुप्रिया सुळे यांनी रेवतीचे सासरे आरएसएसच्या अत्यंत जवळचे असल्याचे सांगितले. मात्र, रेवती आणि सारंग यांच्या नात्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

KDMC Politics: केडीएमसीतील शिंदेसेना-मनसे मैत्रीवर रविंद्र चव्हाणांचे मोठे विधान; ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ म्हणत निशाणा

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सारंग आणि रेवतीचे नाते त्यांचे स्वतःचे आहे. दोघेही एकमेकांसोबत आनंदी असतील, तर आपणही आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या वैयक्तिक आयुष्यात राजकीय विचारसरणीचा हस्तक्षेप होऊ नये, अशीच त्यांची भूमिका या वक्तव्यातून दिसून आली.

लग्न आणि रिसेप्शनला दिग्गज नेत्यांची उपस्थिती

रेवती आणि सारंग यांच्या लग्नाला मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दिल्लीत झालेल्या रिसेप्शनमध्येही विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे अमित शाह आणि राहुल गांधी यांचीही या रिसेप्शनमध्ये उपस्थिती होती. याशिवाय नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

रेवतीचे सासरे अरुण लखानी हे उद्योग क्षेत्राशी संबंधित असून भाजपच्या वर्तुळाशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या विवाहसोहळ्यातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीची चर्चा अधिक रंगली. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे या सर्व चर्चांना कौटुंबिक नात्याच्या चौकटीत पाहण्याचा संदेश मिळाला आहे. राजकीय मतभेद वेगळे आणि मुलांचे वैयक्तिक आयुष्य वेगळे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Web Title: Supriya sule revati sule marriage sarang lakhani bjp connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • RSS
  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
1

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.