Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य

राज्यातील सुमारे 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांना व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाइस (व्हीएलटी) आणि पॅनिक बटन बसविले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 22, 2025 | 02:42 PM
RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य
Follow Us
Follow Us:
  • आरटीओच्या व्हीएलटी सेंटरला वर्षभरात एकच तक्रार
  • वर्षभरात एकुण 6 लाख 30 हजार अलर्ट
मुंबई :  राज्यातील सुमारे 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांना व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाइस (व्हीएलटी) आणि पॅनिक बटन बसविले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे महत्वाचे असून, याद्वारे जानेवारी ते नोव्हेंबर यादरम्यान 6 लाख 30 हजार 259 अलर्ट आले आहेत. या अलर्टमध्ये फक्त एका महिलेने प्रवासादरम्यान दुचाकीस्वाराची तक्रार केली आहे.दिल्लीतील एका मुलीवर २०१२ रोजी धावत्या बसमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. त्या घटनेनंतर देशभरातील सर्व प्रवासी वाहनांमध्ये व्हीएमटी आणि पॅनिक बटन अनिवार्य करण्यात आले. केंद्रीय मोटार लाहन नियम 1989 मधील अरतुदींना अनुसरून त्यांची अमलबजावणी करण्यात आली.

नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

कंट्रोल अँड कमांड सेंटरचे काम

अंधेरी आरटीओमध्ये असलेले कर्माड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटर 24 तास सुरू असते. यासाठी मुंबईतील 4 आरटीओ कार्यालयांमधील सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची प्रत्येकी 8 तासांच्या शिफ्टामध्ये कार्यरत असतात. कमांड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटरमधील स्क्रीनवर अलर्ट आल्यावर तातडीने त्या वाहनाच्या ड्रायव्हरला संपर्क साधला जातो व प्रसंगाविषयी माहिती घेतली जाते. ज्या प्रकरणांमध्ये महिलांची छेडछाड अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असल्याचे निदर्शनास येते, त्या प्रकरणात सहायक मोटार वाहन निरीक्षक है वाहनाचे लाइव्ह लोकेशन, परवानाधारकाचे नाव व नंबर ही माहिती पोलिस विभागाकडे पाठवली जाते. त्यानंतर कारवाईकरून त्याचा रिपोर्ट आरटीओकडे पाठवण्यात येतो.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 महिन्यांत 47जणांचा बळी ; वनविभागाच्या डायरीत 5 वर्षांत 300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद

पॅनिक बटणांद्वारे तक्रारींचे निरसन

राज्यातील वाहनांवर बसविलेल्या या व्हीएलटी आणि पनिक बटणच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचे निरसन कारण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर 15 जानेवारी 2025पासून सुरू करण्यात आले. वाहनामधील व्हीएलटी मध्ये लोकेशन ट्रेकर, रिअल टाइम लोकेशन, स्पीड अलर्ट, जिओ-फेन्सिंग अशा गोष्टीची माहिती आरटीओला उपलब्ध होते.

महिलेची तक्रार

वसई परिसरात कार्यालयातून घर जात असताना काही दुचाकीस्वा त्रास देत असल्याच्या भीतीने एक महिला प्रवाशाने पॅनिक बटन दाबले होते. मात्र, संबंधित दुचाकीस्वार हे तिच्या कार्यालयातील मित्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोणतीह कारवाई केली नाही.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हीएलटी (Vehicle Location Tracking) आणि पॅनिक बटन म्हणजे काय?

    Ans: व्हीएलटी ही वाहनाचे थेट (रिअल टाइम) लोकेशन, वेग, हालचाल यावर लक्ष ठेवणारी प्रणाली आहे. पॅनिक बटन आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी दाबल्यास तात्काळ अलर्ट कंट्रोल सेंटरला पाठवते.

  • Que: राज्यात किती वाहनांमध्ये व्हीएलटी आणि पॅनिक बटन बसवण्यात आले आहेत?

    Ans: महाराष्ट्रात सुमारे 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये व्हीएलटी आणि पॅनिक बटन बसवण्यात आले आहेत.

  • Que: या अलर्टपैकी महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित किती तक्रारी होत्या?

    Ans: या अलर्टमध्ये फक्त एका महिलेने प्रवासादरम्यान त्रास झाल्याची तक्रार नोंदवली होती.

Web Title: Rto news digital security system for passengers vmt and panic button mandatory in vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai News
  • RTO

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
3

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
4

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.