मुंबई : मानवी वसाहतींमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढू लागल्यामुळे या दोन प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत 47 जणांचा बळी गेला आहे, तर वनविभागाच्या डायरीत पाच वर्षात 377 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या डायरीनुसार, गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 250, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 87जणांचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, कोल्हे, तरस, रानगवा इत्यादी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही अनेक जण जखमी झाले आहेत.
वन्यप्राण्यांचा वावर शहरी भागात वाढला वाघ, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हे, तरस, अस्वल, लांडगा, माकड आणि खोकड यांचा वावर आता शहरी भागातही वाढला आहे. त्यामुळे मनुष्य आणि पशुधनावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. झपाट्याने होणारी जंगलतोड आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर झालेल्या मानवी घुसखोरीमुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे.
जंगलांची बेसुमार कत्तल झाल्यानेअन्न व आश्रयासाठी वन्यप्राणा मानवी वसाहतीकडे येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्ष अटळ झाला आहे. पिडितांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडितांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांचीआर्थिक मदत दिली जाते. परंतु मृत्यू आणि हल्ले पाहता मदत हा उपाय नसून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात आधी मानव आणि वाघ संघर्ष गंभीर होता. आता त्यामध्ये बिबट्याची भर पडली आहे.
संपूर्ण राज्यात सुमारे पाच हजार बिबटे असून एकट्या जुन्नर तालुक्यात साडेसातशे बिबटे आहेत. त्याचप्रमाणे राज्यात 444 वाघ आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याचे हल्ले नागरी वस्तीत होऊ लागले आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जंगलात नागरी वस्ती वाढत असल्याने वन्यजीवही त्रस्त झाले आहेत. मात्र सर्वच बिबटे जंगलातले नाहीत, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर इत्यादी ठिकाणी उसाच्या शेतात बिबट्यांचा जन्म झाला आहे तेथेच ते वाढले आहेत.
Ans: मागील दहा महिन्यांत वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: : वनविभागाच्या नोंदीप्रमाणे गेल्या पाच वर्षांत एकूण 377 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Ans: पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 250 जणांचा, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाला आहे.






