पुणे – दोन वर्षांनंतर कोरोनामुक्त आणि सरकारच्या निर्बंध शिथीलीत तसेच पुणे पोलिसांची नियमावली नसताना होत असलेल्या वैभवाशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूक यंदा लांबणार असल्याची दाट शक्यता आहे. दोन वर्षांपुर्वी रेकॉर्डब्रेक करत अत्यंत कमी वेळात मिरवणूक पुर्ण झाली होती. मात्र, यंदा रेकॉर्डब्रेक मिरवणूक होईल व आतापर्यंतचे वेळेचे सर्वरेकॉर्ड मोडले जातील असेही बोलले जाऊ लागले आहे. यंदा नसणारी बंधने हे मुख्य कारण विसर्जन मिरवणूक सांगितले जात आहे.
पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता उद्या होत आहे. आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या विसर्जन मिरवणूका यंदा दोन वर्षांच्या कोरोनामुक्तीमुळे धुमधडाक्यात होत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचा आनंद द्विग्नीक असल्याचे पाहिला मिळत आहे. सरकारने देखील यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सांगितले. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील नियम शिथील केले. दरवर्षी प्रमुख मंडळांसमोर तीन ढोल-ताशा पथक लावण्याचा नियम यंदा पोलिसांनी न ठेवल्याने परिणामी मिरवणूका लांबणार असल्याचे दिसत आहे.
दोन वर्षांपुर्वी म्हणजेच २०१९ मध्ये झालेली विसर्जन मिरवणूक अत्यंत कमी वेळात २४ तासात पुर्ण झाली होती. तो रेकॉर्डब्रेक विसर्जन मिरवणूकीचा वेळ ठरला होता. तत्पुर्वी २०१३ ते २०१८ या कालावधीत जवळपास २६ ते २९ तास असा वेळ विसर्जन मिरवणूकींचा राहिलेला आहे. त्यातच यंदा गर्दी देखील वाढण्याची शक्यता असल्याने हा वेळ आणखी वाढेल असेही म्हटले जाऊ लागले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव रेकॉर्डब्रेक होईल, अशीच अपेक्षा आहे.
दहा वर्षांचे विसर्जन मिरवणूकीच्या वेळा…
साल व वेळ
२०१३- २७ तास २५ मिनिटे
२०१४- २९ तास १२ मिनिटे
२०१५- २८ तास ३८ मिनिटे
२०१६- २८ तास ३० मिनिटे
२०१७- २८ तास ०५ मिनिटे
२०१८- २६ तास ३६ मिनिटे
२०१४- २४ तास