Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी महिला आयोगाची भूमिका काय? रुपाली चाकणकर म्हणाल्या…

वैष्णवी हगवणेसारख्या महिलेचा जीव जात असेल तर, या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. याबाबत महिला आयोग कडक भूमिका घेत आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2025 | 04:24 PM
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी महिला आयोगाची भूमिका काय? रुपाली चाकणकर म्हणाल्या...

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी महिला आयोगाची भूमिका काय? रुपाली चाकणकर म्हणाल्या...

Follow Us
Follow Us:

कराड : हुंडा विरोधी कायदा असताना आजही हुंड्यासाठी छळ होत आहेत. त्यात वैष्णवी हगवणे सारख्या महिलेचा जीव जात असेल तर, या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. वैष्णवीचा मृत्यू दुर्दैवी आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी कायद्याच्या चौकटीत राहून राज्य महिला आयोग कडक भूमिका घेत आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले. कराड दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

चाकणकर म्हणाल्या, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी राज्य महिला आयोगाने तपास यंत्रणेला सूचना केल्या आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. काहीजण ताब्यात आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई तर होणारच आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणाचा महिला आयोगाच्या वतीने आम्ही निश्चितच पाठपुरावा करणार आहोत. खरंतर, राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत. त्यांच्या मुलाकडे पक्षाचे एक पद होते. पण पक्ष कोणताही असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे कोणीही असले तरी, गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही. उलट ही विकृती ठेचून काढली पाहिजे, असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. तसेच राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला पक्षातून निलंबित केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘त्या’ वडिलांच्या नावावर निवडून आल्या आहेत

रोहिणी खडसे यांनी केलेल्या राज्य महिला आयोगाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असल्याच्या विधानावर विचारले असता चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगावर बोलणाऱ्या त्या कोण आहेत? त्या त्यांच्या वडिलांच्या नावावर निवडून आल्या आहेत. त्यांच्याच कार्यालयातील पीए आणि त्याच्या बायकोच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या आहेत. त्या स्वतः संबंधित महिलेला न्याय देवू शकत नाहीत, याचा त्यांनी अगोदर विचार करावा. उलट राज्य महिला आयोगाचे काम गेल्या साडेतीन वर्षांमध्ये चांगले चालले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बोलण्याला विशेष महत्त्व द्यावे, असे मला वाटत नसल्याची टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Rupali chakankar has responded to the vaishnavi hagavane death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Rajendra Hagawane
  • rupali chakankar
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.