पंढरपुरमध्ये शांततेत मतदान सुरू (फोटो- टीम नवराष्ट्र)
अक्कलकोट: विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. २५० अक्कलकोट विधानसभा निवडणुक करिता बुधवारी दुपारी १ पर्यत शांततेमध्ये ३१ १८ % व दुपारी तीन पर्यंत ४७. १५ व दुपारी ५ पर्यंत सरासरी५८ % मतदान झाले होते.
भाजपा कॉग्रेस रासपा वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पार्टी मनसे बहुजन समाज पार्टी हे सात पक्षाकडून व पाच अपक्ष निवडणुक रिंगणात आहेत . या बारा उमेदवराचे भवितव्य यांत्रिक मशिनमध्ये बंद झाले २३ नोव्हेबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांची घालमेल वाढली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी पुनश्च आमदार सचिन कल्याणशेट्टी मोठया मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे कॉग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये लागली पैज
भाजपाचे कल्याणशेट्टीच दुसऱ्यांदा विजयी होणार की ‘कॉग्रेसचे माजी मंत्री म्हेत्रे सातवी विधानसभा निवडणुक जिंकणार याबाबत भाजपा व कॉग्रेस समर्थकामध्ये पैजा लागल्या आहेत. भाजपाच्या सभेतील गर्दीवरून समर्थक विजयाचा दावा करत आहेत. तर कॉग्रेसच्या सभेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून कांग्रेसच्या विजयाचा दावा समर्थक करीत आहेत .
निवडणुक लढविणारे उमेदवार
भाजपा महायुतीचे सचिन कल्याणशेट्टी , महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे , मनसेचे मल्लीनाथ पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनिल बंडगर वंचित बहुजन आघाडीचे संतोषकुमार इंगळे ‘ बहुजन समाज पार्टीचे इकरार शेख प्रहार जन शक्ती पार्टीचे जमीर शेख अपक्ष पुजा पाटील ‘ प्रसाद बाबानगरे ‘ शिवनिंगप्पा वंगे सिद्धाराम कोळी ‘ , ज्ञानोबा साळुंखे हे १२ उमेदवार विधानसभाकरिता भाग्य आजमावित आहेत.
अक्कलकोट विधानसभा मतदार संघात ३९० मतदान केंद्रावर बुधवारी मतदान झाले व सहाय्यकारी ६ मतदान केंद्र होते. यामध्ये दक्षिण सोलापुर तालुक्यातील तीन मंडलातील ३५ गावतील ३२ ग्रामपंचायती मधील ८८ मतदान केंद्रावर मतदान झाले. अक्कलकोट तालुक्यातील ११ मंडलातील १३२ गावे आहेत.
अक्कलकोट ग्रामीण मधील 238 मतदान कंद्रावर मतदान झाले. अक्कलकोट शहरामध्ये ४१ मतदान केंद्रावर मैंदर्गी मध्ये १३ व दुधनी मध्ये १० केंद्रावर शांततेमध्ये मैंदर्गी मध्ये रांगा लाऊन मतदान झाले .
२०२४ च्या निवडणुकी करिता ३ लाख ८३ हजार ४७ ९ मतदार पात्र आहेत यामध्ये पुरुष मतदार संखा १ लाख ९६ हजार ५७७ व स्त्री मतदार १ लाख ८ ६ हजार ८५९ मतदार संख्या आहे. यामध्ये दुपारी तीन पर्यंत पुरुष मतदार ८९ हजार ८०० मतदारांनी मतदान केले. ९० हजार ९८८ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ विधान सभा निवडणुकीत ३ लाख ४६ हजार ४९८ मतदार पात्र होते . यंदा ३६९ ८ १ मतदार वाढले आहेत .