नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Weather News in Marathi : काठमांडू : नेपाळमधील हिंसाचारानंतर (Nepal Violence) आता नैसर्गिक आपत्तीचे मोठे (Nepal) संकट उभे राहिले आहे. सततच्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भूस्खलनाचाही धोका लक्षात घेता शनिवारी (०४ ऑक्टोबर) काठमांडूत वाहतूकीवर बंदी घातली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या सुचनेनुसार, शनिवार ते सोमवार पर्यंत सर्व वाहनांना काठमांडूच्या खोऱ्यात प्रवेश बंदी केली आहे. तसेच नागरिकांना बाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे.
ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
लोकांना तीन दिवसांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास टाळण्याचा सल्ला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाने दिला आहे. याशिवाय बागमती आणि पूर्व राप्ती नद्यांच्या काठावरी भागांमध्ये रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून (०३ ऑक्टोबर) काठमांडू आणि देशाच्या इतर भागामध्ये मान्सून सतत धडक आहे. यामुळे आपत्तींचा धोका वाढला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सुचनेमुळे नेपाळने विमानतळ त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (TIA) देशांतर्गत उड्डाणेही रद्द करण्यात आला आहे. TIA चे व्यवस्थापक हंसा राज पांडे यांनी काठमांडू, भरतपूर, जनकपूर, भद्रपूर, पोखरा आणि तुमलिंगटारमधील विमाना सेवा पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
नेपाळमधील कोशी, मधेशी, बागमती, गंडकी आणि लुंबिनी या पाच प्रांतात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे काठमांडूच्या तिबेटसा जोडणाऱ्या अरनिको महामार्गावरील वाहतूकही बंदी करण्यात आली आहे. सततच्यापावसामुळे भूस्खलनाचे धोका वाढत चालला आहे. यामुळे पृथ्वी महामार्ग आणि बी.पी महामार्ग आणि अरनिको महामार्गावर प्रवास धोकादायक आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रश्न १. नेपाळमध्ये कशाचा इशारा जारी करण्यात आला आहे?
नेपाळमध्ये सततच्या मान्सूनमुळे मुसळधार पावासाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
प्रश्न २. नेपाळमध्ये भूस्खलनाच्या भीतीमुळे काय निर्णय घेण्यात आला आहे?
नेपाळमध्ये भूस्खलनाच्या भीतीमुळे वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे?
प्रश्न ३. कोणत्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे?
नेपाळमध्ये सततच्या पावसामुळे बागमती आणि पूर्व राप्ती नद्यांच्या काठावरी भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रश्न ४. कोणत्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे?
नेपाळमधील कोशी, मधेशी, बागमती, गंडकी आणि लुंबिनी या पाच प्रांतात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान