(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी हे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र, फॅशनच्या बाबतीत ते फारसं लक्ष वेधून घेत नाहीत. पण यावेळी मात्र त्यांच्या नव्या लुकने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, आणि अनेकांना तर अजूनही विश्वास बसत नाही की हे फोटो खरे आहेत की AI-जनरेटेड!
अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर एक नवीन लुक शेअर केला आहे, जो सध्या जोरदार चर्चेत आहे. पंकज हे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सक्रियपणे फोटो आणि अपडेट्स शेअर करत असतात, आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांचे नवे अवतार खूप आवडतात. या नवीन फोटोमध्ये पंकज त्रिपाठी यांचा लुक प्रचंड वेगळा आणि आकर्षक आहे, ज्यामुळे तो एक चर्चा विषय बनला आहे.
पंकज त्रिपाठी यांनी फोटोसोबत एक कॅप्शन दिलं आहे, ज्यात ते एक नवीन सुरुवात करत असल्याचे सांगत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एक नवीन सुरुवात,काही तरी मनोरंजक गोष्टीची, वातावरण कसं आहे? यामुळे असे वाटत आहे की पंकज त्रिपाठी हे कदाचित नवीन प्रोजेक्टवर काम करीत आहे, आणि तो प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांसाठी जाहीर होईल.
या लुकमध्ये त्यांनी एक एमराल्ड ग्रीन रंगाचा लांब व्हेलवेट कोट परिधान केला आहे विशेषतः लॅपेल्स, स्लीव्ह्स आणि कफ्सवर नाजूक फुलांचे डिझाइन्स आहे. जे कोटच्या गडद रंगाशी सुंदर जुळून येत आहेत.हा लुक राजेशाही थाट आणि हाय-फॅशन ड्रामा यांचं एक अनोखं मिश्रण आहे.
या व्हायरल झालेल्या लूकवर चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी देखील मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंहने पोस्टवर कमेंट करताना मजेदार अंदाजात लिहिले, “अरे, ये क्या गुरुजी, हम सुधर गए और आप बिगड़ गए!” याशिवाय, डान्सर आणि अभिनेता राघव जुयालने पोस्टवर फायर इमोजी शेअर केली, ज्यामुळे पंकज यांच्या लुकचे आकर्षण अधिक वाढले.
पंकज त्रिपाठी, जे त्यांच्या साध्या आणि सोप्या लुकसाठी प्रसिद्ध आहेत, या वेळेस त्यांच्या नवा लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनवला आहे.अनेक लोक विचार करत आहेत की हे फोटो खरे आहेत की ए.आय.च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.पंकज त्रिपाठीचा हा लुक इतका वेगळा आणि आकर्षक आहे की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.