Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सदाभाऊ खोत अन् पडळकरांनी फडणविसांची घेतली भेट, नेमकं काय चर्चा झाली?

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 21, 2024 | 01:08 PM
सदाभाऊ खोत अन् पडळकरांनी फडणविसांची घेतली भेट, नेमकं काय चर्चा झाली?

सदाभाऊ खोत अन् पडळकरांनी फडणविसांची घेतली भेट, नेमकं काय चर्चा झाली?

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवणे, साखरेची आधारभूत किंमत ३७०० प्रतिटन व्हावी, इथेनॉलच्या दरात ५ रुपये प्रतिलिटर वाढ करण्याबाबत तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी ४ हजार रुपये प्रतिटन मिळण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाला पत्र व्यवहार करावा, अशा आशयाचे पत्र रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.

पत्रात म्हटले आहे की ; सध्या केंद्रशासन कांद्यावर २०% निर्यात शुल्क घेत आहे. जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. परंतु उन्हाळी कांदा महाराष्ट्र राज्यात पूर्ण संपला आहे. आता पावसाळी कांदा बाजारात येत आहे. त्याचे एकरी ५० ते ८० क्विंटल उत्पन्न येत आहे. अति पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसात रांगडा कांदा बाजारात येणार आहे. आज बाजार भावात गेल्या २० दिवसात खूप मोठी पडझड झाली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य केले तरच शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील. म्हणून कांद्यावरीत निर्यात शुल्क शून्य करणेबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

सन २०१९ मध्ये ३१०० रुपये प्रती क्विंटल इतकी साखरेची आधारभूत किंमत निश्चित केली आहे. त्यावेळी ऊसाची एफआरपी २७५० रुपये प्रतिटन इतकी होती. त्यामध्ये पांच वेळा वाढ करून ती आता ३४०० रुपये टन इतकी वाढविली आहे. पण आधारभूत किंमतीत वाढ केलेली नाही. त्यामध्ये वाढ करून साखरेची आधारभूत किंमत ३७०० रुपये प्रतिटन इतकी करण्यात यावी. २०२४-२५ गाळप हंगाम सुरू झालेला आहे. बाजारातील सध्या साखरेस मिळणारा दर पाहिलेस गेल्या दोन महिन्यात तो ३६५० रुपये प्रती क्विंटलवरून ३३०० रुपयां पर्यंत घसरलेला आहे. ऊस उत्पादक शेतकरीही वाढलेल्या खतांच्या व मशागतीच्या दरामुळे मुळातच आर्थिक अडचणीत आहे. त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. अशातच ऊसाची बिले वेळेत मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते वेळेत भरतां येत नाहीत. बँकांच्या व्याजाचा खर्च वाढलेने शेतकरी वर्ग मेटाकूटीस आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला

तेंव्हा केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत ३७०० रुपये त्या प्रमाणात सर्व प्रकारचे इथेनॉलचे सध्याचे दरात सरासरी रु. ५/- प्रति लिटर वाढ तातडीने जाहीर करणे जरूरीचे आहे. त्याच प्रमाणे देशातील १-१०- २०२४ रोजीचा साखरेचा स्टॉक ८१ लाख मे. टन असून या चालू गाळप हंगामात २९० लाख मे. टन साखर (इथेनॉल निर्मितीस वापरावयाची ४० मे. टनसाखर सोडून) उत्पादीत होईल असे अंदाज आहेत. देशाचा साखरेचा खप २८० लाख मे. टन आहे. म्हणजे देशात एकूण साखरेची उपलब्धता २९० उत्पादन ८१ मागील स्टॉक = ३७१ लाख मे.टन इतकी होणार आहे. त्यातून देशांतर्गत साखरेचा खप २८० लाख वजा केलेस वर्ष अखेरीस ९१ लाख साखर शिल्लक राहिल. यातून तीन महिन्याचे खपा इतकी साखर म्हणजे ६६ लाख मे. टन इतका बफर स्टॉक वजा केलेस २५ लाख मे. टन साखर जादा शिल्लक राहते. सध्या कारखान्यांना या शिल्लक असलेले साखरेवर उचल केलेले साखर माल तारण कर्जावरील व्याजाचा विनाकारण बोजा सोसावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आज मितीस साखरेस चांगला भाव मिळत आहे. त्याचाही फायदा कारखान्यांना होईल.

आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारला याप्रश्नी पत्र व्यवहार केलेला आहे. तसेच राज्य सरकार सकारात्मक असून, याबाबत केंद्र शासनाला तात्काळ पत्र व्यवहार करून विनंती करणार असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Sadabhau khot and bjp leader gopichand padalkar have met chief minister devendra fadnavis nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • gopichand padalkar
  • maharashtra

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.