Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सह्याद्री’चा भावी चेअरमन स्वाभिमानी सभासदच ठरवतील; विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचं विधान

बाळासाहेब पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक कार्यालयाजवळ दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपले अर्ज सहाय्यक निवडणूक अधिकारी अपर्णा यादव व संजय जाधव यांच्याकडे दाखल केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2025 | 11:00 AM
'सह्याद्री'चा भावी चेअरमन स्वाभिमानी सभासदच ठरवतील; विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचं विधान

'सह्याद्री'चा भावी चेअरमन स्वाभिमानी सभासदच ठरवतील; विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या 50 वर्षांपासून सर्वसामान्य सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. हीच भूमिका घेऊन आम्ही कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात आहोत. विद्यमान चेअरमन यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केले, हे पाहून स्वाभिमानी सभासदच कारखान्याचा भावी चेअरमन ठरवतील, असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्री कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सोमवार (दि. ३) रोजी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपले दोन अर्ज दाखल केले आहेत. बाळासाहेब पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक कार्यालयाजवळ दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपले अर्ज सहाय्यक निवडणूक अधिकारी अपर्णा यादव व संजय जाधव यांच्याकडे दाखल केले. सोमवारी १६७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, आजपर्यंत विक्री झालेल्या अर्जांची संख्या २२१ झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केले. बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांतून आणि प्रेरणेतून आदरणीय पी. डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सुरुवातीला कारखाना कार्यक्षेत्रातील कमी उसाचे क्षेत्र पाहता कारखान्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या, आरफळ कॅनॉल झाला, हणबरवाडी-धनगरवाडी योजना झाली. त्यामुळे ऊस क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याने कारखान्याची विस्तारवाढ करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार, साडेसात हजार टनाचा कारखाना आज साडेआठ ते नऊ हजार टनाचे गाळप करत आहे’.

तसेच भविष्यात आणखी वाढ करून ११ हजार टन दिवसाला ऊस गाळप करण्याचा परवाना कारखान्याने घेतला आहे. ११ हजारांची सरासरी मिळवण्यासाठी साधारण तेरा, साडेतेरा हजार टन प्रतिदिन ऊस गाळप करावा लागणार आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या मशिनरीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीत दुरंगी लढत आहे का?

या निवडणुकीत दुरंगी लढत आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत मला काही कल्पना नाही. आमच्या पॅनेलच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली असून, काहींनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. काहीजण आज, उद्या व परवा अर्ज दाखल करतील. 21 तारखेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

Web Title: Sahyadri factory chairman will be decided by the members says balasaheb patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • balasaheb patil
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
1

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
2

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
3

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
4

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.