Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Saidongar Deforestation : साय डोंगरातील टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद; महेंद्र थोरवेंच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा विरोध

Karjat Saidongar Deforestation : कर्जतच्या साय डोंगरातील टोरंट पॉवरच्या तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जा साठवण प्रकल्पावरून स्थानिक राजकारण तापले आहे. आमदार महेंद्र थोरवेंचा प्रकल्पाला पाठिंबा, तर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांचा वृक्षतोडीला विरोध केला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 27, 2026 | 09:37 PM
mahendra thorve sudhakar ghare

mahendra thorve sudhakar ghare

Follow Us
Follow Us:
  • साय डोंगरातील टोरंट प्रकल्पावरून राजकारण तापले
  • महेंद्र थोरवेंचा प्रकल्पाला पाठिंबा, सुधाकर घारेंचा विरोध
  • वृक्षतोडीविरोधात स्थानिक, पर्यावरणप्रेमी एकवटले
 

कर्जत : कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या ऊर्जा साठवण प्रकल्पावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पाला चहूबाजूंनी विरोध होत असतानाच आता महायुतीतील मित्रपक्षांनीसुद्धा आक्षेप घेतला असल्याचं दिसत आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि राजकीय विरोधकांकडून विरोध होत असतानाच आता सत्ताधाऱ्यांना मित्रपक्षांनासुद्धा सामोरे जावे लागत आहे. (Karjat Saidongar Deforestation)

या प्रकल्पावरून वाद निर्माण होत असतानाच एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, अशी भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी वृक्षतोड आणि स्थानिकांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

थोरवेंच्या समर्थनावरून घारेंची टीका

साय डोंगर परिसरातील प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होत असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. या प्रकल्पातून रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता त्यांनी मांडली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रकल्पाला विरोध होत असतानाही थोरवे समर्थन का देत आहेत, असा सवाल सुधाकर घारे यांनी उपस्थित केला.

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका

घारे यांनी थोरवेंच्या भूमिकेवर टीका करत स्थानिकांच्या हिताचा विचार करण्याची गरज अधोरेखित केली. स्थानिकांना नुकसान पोहोचवणारे प्रकल्प आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वृक्षतोडीविरोधात स्थानिक एकवटले

कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाशी संबंधित वृक्षतोडीवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. वृक्षतोड जवळपास सहा महिने सुरू राहणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या मुद्द्यावर स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्षानेदेखील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.

जनसुनावणीतील विरोधावरून सवाल

राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी प्रकल्पाच्या जनसुनावणीदरम्यान स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचा दावा केला. अशा परिस्थितीत प्रकल्प पुढे कसा नेला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एकीकडे रोजगारनिर्मितीचा मुद्दा मांडला जात आहे, तर दुसरीकडे जंगल आणि स्थानिक पर्यावरणाच्या संरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळे साय डोंगरातील प्रकल्पाबाबत पुढील निर्णय काय होतात, तसेच वृक्षतोड आणि स्थानिकांच्या आक्षेपांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Karjat torrent Power Project : ओमराजे निंबाळकरांचा सरकारला घरचा आहेर, वृक्षतोडीवरून राजकारण पेटलं…

💡

Frequently Asked Questions

  • Que: साय डोंगरातील टोरंट प्रकल्प नेमका काय आहे?

    Ans: कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाशी संबंधित वृक्षतोडीवरून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला आहे.

  • Que: टोरंट प्रकल्पाला महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांची भूमिका काय आहे?

    Ans: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याची शक्यता मांडत समर्थन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मात्र वृक्षतोड आणि स्थानिकांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करत प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

  • Que: साय डोंगरातील वृक्षतोडीला कोण विरोध करत आहे?

    Ans: स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणवादी संघटना, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शेतकरी कामगार पक्षाने विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनीही स्थानिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Karjat sai dongar torrent project mahendra thorve sudhakar ghare vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • karjat news
  • Mahendra Thorve
  • Raigad News
  • Sudhakar Ghare

संबंधित बातम्या

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका
1

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
2

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?
3

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Karjat Electricity News : कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर
4

Karjat Electricity News : कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.