Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची’, बागेश्वर महाराजांनी तोडले अकलेचे नवे तारे, वाद पेटणार ?

महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर महाराजांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 30, 2023 | 07:13 AM
Dhirendra Shastri's big revelation

Dhirendra Shastri's big revelation

Follow Us
Close
Follow Us:

रायपूर – बागेश्वर महाराज आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर महाराजांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले बागेश्वर महाराज?
“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”

संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर महाराजांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर धाम यांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर महाराजांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केली.

Web Title: Saint tukaram maharajs wife used to beat him daily bageshwar baba broke akalis stars possibility of a new controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Saint Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत
1

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान
2

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी
3

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
4

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.