Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप

समृद्धी महामार्गासाठी ही जमीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आले होते. या जमिनीची किंमत १,१५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सुरुवातीला या जमिनीचे कोणतेही कायदेशीर वारस समोर आले नव्हते.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 25, 2026 | 01:56 PM
Ambadas Danve Allegations, Sandipan Bhumre Scam, Samruddhi Mahamarg Corruption,

Ambadas Danve Allegations, Sandipan Bhumre Scam, Samruddhi Mahamarg Corruption,

Follow Us
Follow Us:
  • समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा घोटाळा
  • सरकारी खजिना लुटण्यासाठी ११५० कोटींचा मोठा घोटाळा
  • यापूर्वी या चालकाच्या नावावर ४०० कोटी रुपयांच्या कराराचे प्रकरण समोर आले होते
 

Ambadas Danve Allegations On Sandipan Bhumre: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग सातत्याने अपघाताच्या घटनांमुळे चर्चेत असतो. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अंबादास दानवे यांच्या आरोपांवरून एकच खळबळ उडाली आहे.

सरकारी खजिना लुटण्यासाठी ११५० कोटींचा मोठा घोटाळा करण्यात आला, यात खासदारांच्या चालकांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विकास मंडळाने छत्रपती संभाजीनगर मधील जटवाडा भागातील २३ एकर आणि ३० गुंठे जमीन खरेदी केली होती. (Samruddhi Mahamarg)

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

समृद्धी महामार्गासाठी ही जमीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आले होते. या जमिनीची किंमत १,१५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सुरुवातीला या जमिनीचे कोणतेही कायदेशीर वारस समोर आले नव्हते. पण एवढी मोठी रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट होताच काही लोकांनी अचानक जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास आणि पैसे मागण्यास सुरुवात केली.  (Financial Scam)

 

१९८५ मध्ये जन्मलेले, १९७१ मध्ये जमीन व्यवहार

अंबादास दानवे यांनी या प्रकरणात धक्कादायक पुरावे सादर केले आहेत. या जमिनीसाठी हिबानामा (दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करण्याची मुस्लिम प्रथा) जावेद रसूल शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आला होता. कागदपत्रांनुसार, हा हिबानामा १९७१ मध्ये राबवण्यात आला होता. जावेद या व्यक्तीच्या नावावर हा व्यवहार झाला, त्याचा जन्म १९८५ मध्ये झाला होत. मग एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या १४ वर्षांपूर्वी जमीन एखाद्या व्यक्तीच्या नावावर कशी असू शकते, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

 

खासदार भुमरे यांचे चालक जावेद

अंबादास दानवे यांच्या मते, ज्यांच्या नावाने हा कोट्यवधींचा व्यवहार झाला तो जावेद हा खासदार संदीपान भुमरे यांच्या वाहनाचा चालक होता. यापूर्वी या चालकाच्या नावावर ४०० कोटी रुपयांच्या कराराचे प्रकरण समोर आले होते. खासदार भुमरे यांनी समृद्धी महामार्गाच्या या जमिनीवरही मोठी कारवाई केली आहे, चालकाच्या नावावर असलेले ११५० कोटी रुपये हडप करण्याचा कट रचला आहे. मृत व्यक्तीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी निधी हडप करण्याचा हा प्रयत्न आहे.

 

 

Web Title: Samruddhi mahamarg scam of rs 1150 crore in samruddhi highway ambadas danves allegations against mp bhumre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Samruddhi Mahamarg
  • Scam Case

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! तब्बल 1160 कोटींचा इथेनॉल घोटाळा समोर; कुपोषितांच्या 50 लाख क्विंटल तांदळावर डल्ला
1

मोठी बातमी ! तब्बल 1160 कोटींचा इथेनॉल घोटाळा समोर; कुपोषितांच्या 50 लाख क्विंटल तांदळावर डल्ला

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप
3

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

Sangli News: सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा? ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!
4

Sangli News: सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा? ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.