Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्गात दोन जिल्हाप्रमुख, संदेश पारकर, संजय पडते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

सध्या कार्यरत असणारे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 07, 2023 | 12:12 PM
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्गात दोन जिल्हाप्रमुख, संदेश पारकर, संजय पडते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
Follow Us
Follow Us:

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या तालुक्यांकरता जिल्हाप्रमुख म्हणून संदेश पारकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे कणकवली विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या कार्यरत असणारे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अतुल रावराणे हे कणकवली विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकारांद्वारे या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेले काही महिने सुरू असलेला शिवसेनेच्या पक्षांतर्गत पद नियुक्तींचा घोळ तुर्तास तरी सुटला आहे.

संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पक्षाने संघटनात्मक जबाबदारी द्यावी. पक्ष देईल ती जबाबदारी आपण घेऊ आणि त्या पदाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करु तसेच पक्ष संघटना वाढीसाठी काम करु असे सांगितले होते. त्यानुसार पक्षाने संदेश पारकर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करुन पक्ष संघटना वाढीसाठी जबाबदारी पारकर यांना दिली आहे. त्यामुळे पारकर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे‌ काम जोमाने सुरु ठेवण्यासाठी‌ ऍक्टिव्ह होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Web Title: Sandesh parkar sanjay padte uddhav balasaheb thackeray shivsena sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2023 | 12:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • shivsena
  • Uddhav Balasaheb Thackeray

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
4

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.