Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप

शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि सार्वजनिक हालचालींना अडथळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 06:10 PM
Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप
Follow Us
Follow Us:
  • कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा
  • नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप
कवठे महांकाळ : शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि सार्वजनिक हालचालींना अडथळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ, चौक तसेच सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने नियोजनाचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अतिक्रमणाचा मुद्दा ठळकपणे समोर आला होता.

नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट

नगरपंचायतीच्या तातडीने मुख्याधिका-यांना अतिक्रमणे हटविण्याच्या स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दिरंगाई न करता कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, या सूचनांनंतरही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. शहरातील अतिक्रमणे जैसे थे कायम असून प्रशासनाने जणू डोळेझाक केल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, शाळा, रुग्णालये आणि मुख्य बाजारपेठ परिसरातही अतिक्रमणांचा फैलाव वाढल्याने आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिकांच्या हालचालींनाही अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाणार; एक लाख कोटीचा प्रस्ताव

मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
खासदारांच्या स्पष्ट सूचनांनंतरही प्रशासन निष्क्रय का आहे. अतिक्रमण धारकांवर कोणाचा दबाव आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या विकासाला खीळ घालणाऱ्या अतिक्रमणांविरोधात तातडीने मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि वाहतुकीस सुलभ ठेवण्यासाठी नगरपंचायतीने तात्काळ सर्वेक्षण करून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

कवठेमहांकाळ शहर अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले असताना नगरपंचायत प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले आहे. खासदारांनी स्पष्ट सूचना देऊनही कारवाई होत नसेल, तर ही प्रशासनाची मोठी निष्क्रयता आहे. भ्रष्ट आणि अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी झाल्याखेरीज नगरपंचायतीचा कारभार सुरळीत होणार नाही.
पांडुरंग पाटील, नेते, शेतकरी विकास आघाडी, कवठेमहांकाळ

सह्याद्रीचा नवा राजा: ‘राणोजी’! राधानगरीच्या जंगलात नव्या नर वाघाची एन्ट्री; एक जबदस्त झलक

Web Title: Sangali news encroachment in kavathe mahankal action stalled despite instructions from nagar panchayat citizens are furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.