जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Governor : मुंबई : महाराष्ट्राच्या संवैधानिक पदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्रिपुराचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन (पूर्वीचे राजभवन) येथे झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना मुंबई (Mumbai News) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी, सोमवारी जिष्णू देव वर्मा त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबईत आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देखील दिला. यावेळी देखील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यानंतर आता मुंबईमध्ये जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे.
हे देखील वाचा : उद्या राजकारणात भूकंप येणार? संसदेत Om Birla यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; BJP चा प्लॅन काय?
जिष्णू देव वर्मा कोण आहेत?
जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुरा राज्यातील आहेत. त्यांच्या जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी आगरतळा येथे माणिक्य घराण्यात झाला. ते केवळ एक अनुभवी राजकारणी नाहीत तर त्यांना कला आणि संस्कृतीचीही खूप आवड आहे. त्यांनी १९९० च्या दशकात भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २०१८ ते २०२३ दरम्यान त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, त्यांनी अर्थ, ऊर्जा आणि ग्रामीण विकास यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली.
#LIVE | ‘महाराष्ट्राचे नवनियुक्त मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी समारंभ’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती @maha_governor @Jishnu_Devvarma @Dev_Fadnavis#Maharashtra #Mumbai #OathCeremony https://t.co/8VFT5GMVEa — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 10, 2026
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा
तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अनुभव
महाराष्ट्रात येण्यापूर्वी जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलिकडेच केलेल्या फेरबदलानंतर त्यांना महाराष्ट्राचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे. सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यापासून आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होताना हे पद रिक्त होते. यानंतर आता जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे.






